Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी पंपांच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 150 शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त; तब्बल…

जुन्नर, आंबेगाव आणि नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2026 | 12:30 AM
कृषी पंपांच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 150 शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त; तब्बल...

कृषी पंपांच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, 150 शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त; तब्बल...

Follow Us
Follow Us:

नारायणगाव : जुन्नर, आंबेगाव आणि नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे १५० शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे केबल चोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.

 

जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील नदीपात्र परिसरात मागील काही दिवसांपासून कृषी पंपांच्या केबल वायर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. ऐन उन्हाळ्यात सिंचनासाठी आवश्यक असलेल्या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक पोलीस फौजदार दीपक साबळे तसेच त्यांच्या पथकाने विविध घटनास्थळांची पाहणी करून तपास सुरू केला. तपासादरम्यान सर्व चोरीच्या घटना एकाच टोळीने केल्याचे निष्पन्न झाले.

गोपनीय माहितीच्या आधारे ही टोळी मध्य प्रदेशातील असून चोरीच्या ठिकाणाजवळ मुक्काम करून रात्रीच्या वेळी गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच आरोपी नाशिक जिल्ह्यातील घोटी परिसरात वास्तव्यास असल्याचे समजताच स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा रचून पाच संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरज्या छत्तेसिंग पवार (वय १९), गगन शापिलाल चौहान (वय १९), अतुल शापिलाल चौहान (वय २१), तपसलाल सर्कस पवार (वय ५०) आणि सुरज रामसर आदिवासी (वय ४०) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी केबल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

हे सुद्धा वाचा : बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

आरोपी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत

पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर कृषी पंपांच्या केबल वायर जप्त केल्या असून, सुमारे १५० शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे. सध्या सर्व आरोपी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे आणि धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

Web Title: The police have arrested a gang that steals cable wires from agricultural pumps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
1

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
3

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
4

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.