Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रॉ अधिकारी’ असल्याचे सांगून सव्वाचार लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले

राजकोट (गुजरात) येथील धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाइन व्यवहारातून फ्रीज करून स्वतःला 'रॉ' अधिकारी असल्याची बतावणी करत खाते सुरू करून देण्याच्या मोबदल्यात लाखो रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 26, 2026 | 03:35 PM
'रॉ अधिकारी' असल्याचे सांगून सव्वाचार लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले

'रॉ अधिकारी' असल्याचे सांगून सव्वाचार लाखांच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : राजकोट (गुजरात) येथील धान्य व्यापाऱ्याचे बँक खाते ऑनलाइन व्यवहारातून फ्रीज करून स्वतःला ‘रॉ’ अधिकारी असल्याची बतावणी करत खाते सुरू करून देण्याच्या मोबदल्यात लाखो रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ४२ वर्षीय व्यापाऱ्याने पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार परेश प्रविण कोठारी (रा. हॉटेल पंचमी, सातारा रस्ता मागे) याच्याविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या बँक ऑफ बडोदा, राजकोट येथील खात्यात वेगवेगळ्या खात्यांतून १ हजाराचे दोन आणि दोन हजाराचे एक असे एकूण तीन ट्रांन्सजॅक्शनमधून ४ हजार ऑनलाइन जमा झाले. नंतर त्यांचे खाते फ्रीज केले गेले होते. बँकेत चौकशी केल्यानंतर हे पैसे पुण्यातील धनकवडीतील प्रविण कोठारी व पुष्पा कोठारी यांच्या खात्यांतून आल्याची माहिती मिळाली. नंतर तक्रारदारांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरच्या व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉलद्वारे स्वतःला ‘रॉ अधिकारी’ असल्याचे सांगितले. त्याने अनेक लोकांची खाती अशाच प्रकारे फ्रीज केल्याचा दावा करत खाते सुरू करण्यासाठी सुरुवातीला ५ लाखांची मागणी केली. तडजोडीअंती रक्कम सव्वा चार लाखांवर निश्चित करण्यात आले. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली.

यानंतर तक्रारदाराने जून महिन्यात पुण्यातील सातारा रोडवरील सिटी प्राईडजवळील कॅफे कॉफी डे येथे संबंधित व्यक्तीची भेट घेतली. त्यावेळी त्याने “पोलिस मित्र” असे लिहिलेले ओळखपत्र दाखवून त्यावर परेश कोठारी असे नाव असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. बैठकीत पुन्हा खाते सुरू करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने वकिलांचा सल्ला घेत (दि. १३ जुलै) गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतरही संबंधिताकडून व्हॉट्सॲप संदेश व फोनद्वारे धमक्या आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्हॉट्सॲप चॅट, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि अन्य पुरावेही तक्रारदाराने पोलिसांकडे दिले.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील तोतया पत्रकाराला बेड्या, महिला पोलिसासह दोघांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अशा ठोकल्या बेड्या

तक्रार दाखल होताच खंडणी विरोधी पथकाने तपासाला सुरूवात केली. चौकशीत परेश कोठारी खंडणी मागत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सातारा रोड येथील पंचमी चौक परिसरात सापळा लावला. परेश हा खंडणीची रक्कम घेण्यासाठी आला असताना, त्याला रंगेहाथ पकडले. सद्या तो पर्वती पोलिसांच्या ताब्यात आहे. परेश यानेच एका गुंतवणूकीच्या संदर्भातील संकेतस्थळावरून तक्रारदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवले होते. नंतर त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार देऊन त्यांचे खाते फ्रिज करण्यास भाग पाडले. नंतर त्याच आधारे फिर्यादीला ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The police have arrested a man who demanded extortion money by claiming to be a raw officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
1

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
2

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
3

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
4

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.