Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Police News: वरिष्ठ निरीक्षकासह तिघे निलंबित, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका

Pune Police News:  पंधरा दिवसांपुर्वी (दि. ७ ऑक्टोबर) दुपारी येतील तक्रारदार श्रवण देवासी व गणपत देवासी हे दुचाकीवरून जात असताना पाच जणांनी ३० लाख रुपये असलेली बॅग त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून हिसकावून पळ काढला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 29, 2026 | 04:40 PM
Pune Police CP Amitesh Kumar, Vishwajeet Jagtap Suspended,

Pune Police CP Amitesh Kumar, Vishwajeet Jagtap Suspended,

Follow Us
Follow Us:
  • मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत जगताप निलंबित
  • ३० लाखांचे लाच प्रकरण
  • ३० लाखांच्या स्प्रे दरोड्याचा गुन्हा
Pune Police News:  ऐन दिवाळीच्या मोहर्तावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन अधिकाऱ्यांसह तिघांचे निलंबन करत मोठा दणका दिला आहे. त्यासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करताना हलगर्जीपणा तसेच कुचराई केल्यानंतर थेट निलंबन कारवाई असल्याचा देखील एक गर्भित इशारा दिला आहे.

हवालाप्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिकेवरून संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांवर निलंबनाची कारवाई तर दुसऱ्या दोन प्रकरणात एका महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

Meenakshi Shinde: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण! मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

मार्केटयार्ड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना ३० लाखांचे हवालाप्रकरण भोवले असून, त्यांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

पंधरा दिवसांपुर्वी (दि. ७ ऑक्टोबर) दुपारी येतील तक्रारदार श्रवण देवासी व गणपत देवासी हे दुचाकीवरून जात असताना पाच जणांनी ३० लाख रुपये असलेली बॅग त्यांच्या तोंडावर स्प्रे मारून हिसकावून पळ काढला होता. याप्रकारानंतर मार्केटयार्ड पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे व कर्मचारी तेथे आले.

घटनेची माहिती घेऊन ते पुन्हा पोलिस ठाण्यास गेले. त्यावेळी पोलिसांनी त्यांची तक्रार एका कागदावर लिहून घेतल्यानंतर कॅमेरे पाहून तुमचा गुन्हा दाखल करू असे सांगितले. नंतर अऩेकदा तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या पायऱ्या झिझवल्या. पण, अधिकाऱ्यांनी त्यांचा दरोड्याचा गुन्हा दाखल न करता केवळ प्रॉपर्टी मिसिंगची तक्रार दाखल करून घेतली. हा प्रकार पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या काणावर पडल्यानंतर त्यांनी बेशिस्तपणाचे वर्तन तसेच बेजबाबदारपणा दिसून आला. तर शिस्तप्रिय पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याने वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत जगताप यांचे निलंबन केले आहे.

Navnath Ban Accuses Eknath Shinde: शिंदे सेनेने पाठीत खंजीर उपसला! भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप

महिला उपनिरीक्षकांचे निलंबन

फुरसूंगी पोलिस ठाण्यात कर्तव्यास असलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक कोमल कचरू जाधव यांचे निलंबन करण्यात आले आहे. एका गंभीर गुन्ह्यांचा तपास त्यांच्याकडे असताना त्यांनी तपासात गंभीर त्रुटी ठेवून अक्ष्यम चुका केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याचप्रकरणात आरोपीने उच्च न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज सादर केल्यानंतर तपासी अधिकारी म्हणून त्रोटक व मोघम स्वरूपाचा अहवाल न्यायालयात सादर केला. तसेच सुनावणीसाठी स्वत: न्यायालयात हजर रहाणे अपेक्षित असताना न राहिल्याने पोलिस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली असल्याचे आदेशात म्हंटले आहे.

महिला कर्मचाऱ्यांचे व्हायरल व्हिडीओनंतर निलंबन

मद्यपानकरून चारचाकी कार विरूद्ध दिशेने चालवून तसेच फुटपाथवर धडकवून नागरिकांनाच तसेच इतर वाहन चालकांना शिवीगाळ केल्याप्रकरणात महिला कर्मचारी अश्विनी केकान यांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्वप्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. अश्विनी केकान या काळेपडळ पोलिस ठाण्यात नेमणूकीस आहेत. त्या दोन दिवस रजेवर असताना ही घटना घडली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोणावर आणि का निलंबनाची कारवाई केली?

    Ans: मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्यासह तिघांवर निलंबनाची  ३० लाखांचा हवाला दरोड्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 

  • Que: मार्केटयार्डमध्ये ७ ऑक्टोबर रोजी नक्की कोणती घटना घडली होती?

    Ans: ७ ऑक्टोबर रोजी तक्रारदार श्रवण देवासी व गणपत देवासी यांच्या तोंडावर स्प्रे मारून ५ अज्ञात चोरट्यांनी ३० लाख रुपये असलेली बॅग लुटली होती.

  • Que: पोलीस आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना काय इशारा दिला आहे?

    Ans: कामात हलगर्जीपणा, गुन्हे दडपणे किंवा नागरिकांना नाहक त्रास दिल्यास कोणतीही गय न करता थेट निलंबनाची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे.कामात हलगर्जीपणा, गुन्हे दडपणे किंवा नागरिकांना नाहक त्रास दिल्यास कोणतीही गय न करता थेट निलंबनाची कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे.

Web Title: Pune police commissioner amitesh kumar suspends senior pi vishwajeet jagtap market yard as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Bribe News
  • crime news
  • Pune CP Amitesh Kumar
  • Pune Police

संबंधित बातम्या

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत
1

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार
2

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

आधी त्रास, नंतर मारहाण अन् अखेर खून; एकतर्फी प्रेमातून महिलेला संपवलं
4

आधी त्रास, नंतर मारहाण अन् अखेर खून; एकतर्फी प्रेमातून महिलेला संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.