Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत

Ganja Farming Case: झटपट श्रीमंत होण्याच्या नादात एका शेतकऱ्याने थेट तुरीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. पिशोर पोलिसांनी लालवन शिवारात धाड टाकून तब्बल ५२ लाखांचा गांजा जप्त केला आहे. तुरीच्या पिकाआड चाललेला हा गोरखधंदा कसा उघड झाला?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 29, 2026 | 03:26 PM
Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत

Ganja Farming Case: छत्रपती संभाजीनगरमध्ये गांजाची शेती; 52 लाखांचा मुद्देमाल जप्त, शेतकरी अटकेत

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्याने तुरीच्या पिकाआड बेकायदेशीरपणे गांजाची केली लागवड
  • १ क्विंटल ५ किलो गांजाची १४१ झाडे आणि ५२.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • ६६ वर्षीय शेतकऱ्याला अटक करून एनडीपीएस (NDPS) कायद्यानुसार गुन्हा दाखल
Ganja Farming Case: झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कायद्याचे उल्लंघन करून शेतात बेकायदेशीर पिकांची लागवड करणाऱ्यांवर पोलिसांची कठोर नजर असते. अशीच एक मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात उघडकीस आली आहे. तालुक्यातील लालवन शिवारात तुरीच्या शेतात गांजाची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी एका ६६ वर्षीय शेतकऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी कोट्यवधींचा गांजा आणि मुद्देमाल जप्त केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

नेमकी कशी उघडकीस आली गांजाची शेती?

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फुलंब्री तालुक्यातील पाडळी एकफाटा शिवारातील गट क्रमांक २८ मधील लालवन शिवारात एका शेतकऱ्याने लपूनछपून गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पिशोर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित शेतात छापा टाकून धडक कारवाई केली. पोलिसांनी प्रत्यक्ष शेतात पाहणी केली असता, तुरीच्या पिकाच्या आडोशाने बेकायदेशीरपणे गांजाची झाडे लावली असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी शेतातून गांजाची तब्बल १४१ झाडे जप्त केली. या जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन १ क्विंटल ५ किलो इतके भरले.

हेही वाचा: Suicide Case News: विरारमध्ये सुन्न करणारी घटना! बंद फ्लॅटमधून दुर्गंधी आली अन् उघड झाला ३ भाऊ-बहिणींच्या मृत्यूचा थरार

५२ लाखांचा मुद्देमाल जप्त, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा

या कारवाईत पोलिसांनी गांजाच्या झाडांसह एकूण ५२ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज आणि मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय शेतकरी चैनसिंग रतनसिंग बिमरोटे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. आरोपी शेतकऱ्याविरुद्ध अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ म्हणजेच NDPS कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोर पोलिसांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी करीत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही कारवाई कुठे आणि कोणत्या भागात करण्यात आली?

    Ans: ही कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील लालवन शिवार (पाडळी एकफाटा शिवारातील गट क्रमांक २८) येथे पिशोर पोलिसांनी केली.

  • Que: पोलिसांनी किती वजनाचा गांजा आणि मुद्देमाल जप्त केला?

    Ans: पोलिसांनी १ क्विंटल ५ किलो वजनाची गांजाची १४१ झाडे जप्त केली असून, एकूण ५२ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

  • Que: याप्रकरणी कोणावर आणि कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: या प्रकरणी ६६ वर्षीय शेतकरी चैनसिंग रतनसिंग बिमरोटे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध NDPS (अमली पदार्थ विरोधी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Phulambari ganja cultivation raid 52 lakhs seized sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • farmer
  • maharashtra crime cases

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार
1

Sambhajinagar Crime: ‘शॉर्टकटने नेतो’ म्हणाला अन् निर्जन स्थळी नेले; ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाचा अत्याचार

Leopard Attack Farmer: गोधडी ठरली ‘सुरक्षा कवच’! गळ्याचा वेध घेणारा बिबट्या कसा पडला मागे?
2

Leopard Attack Farmer: गोधडी ठरली ‘सुरक्षा कवच’! गळ्याचा वेध घेणारा बिबट्या कसा पडला मागे?

Amravati Accident News: क्षणार्धात घात झाला! अप्पर वर्धा कालव्यात पाय घसरला अन् ५२ वर्षीय शेतकरी पाण्याच्या तीव्र प्रवाहात गायब
3

Amravati Accident News: क्षणार्धात घात झाला! अप्पर वर्धा कालव्यात पाय घसरला अन् ५२ वर्षीय शेतकरी पाण्याच्या तीव्र प्रवाहात गायब

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  कर्जत-भीमाशंकर अभयारण्य वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: कर्जत-भीमाशंकर अभयारण्य वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.