Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: कर्जत-भीमाशंकर अभयारण्य वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक

२९ ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी, कर्जत-भीमाशंकर वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, जिओ प्लॅटफॉर्म्सची शेअर बाजारात ऐतिहासिक लिस्टिंग आणि 'अर्नब' चक्रीवादळाचा प्रभाव; वाचा सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 29, 2026 | 10:20 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 29.10.2026

Maharashtra Breaking News Today 29.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 29 Oct 2026 10:20 AM (IST)

    29 Oct 2026 10:20 AM (IST)

    सुरक्षा रक्षकांशिवाय फुटबॉल खेळत होता टायगर! शूटर अगदी जवळ, तरीही का नाही झाला हल्ला?

    बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणात आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि खळबळजनक मोड आला आहे. टायगर श्रॉफची हत्या करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, तर केवळ बॉलिवूडमध्ये स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्याला घाबरवण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता, असा खळबळजनक दावा या प्रकरणातील मुख्य शूटर फूल सिंह आणि रेहान यांनी पोलीस चौकशीदरम्यान केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) केलेल्या कसून चौकशीत आरोपींनी हे दावे केले आहेत.

  • 29 Oct 2026 10:10 AM (IST)

    29 Oct 2026 10:10 AM (IST)

    हरदीपसिंग पुरी केंद्रीय मंत्रिपदी कायम राहणार; राज्यसभेवर जाण्याचा मार्ग अखेर मोकळा

    भाजप नेते हरदीपसिंग पुरी हे केंद्रीय मंत्रिपदी कायम राहणार आहेत. पक्षाने त्यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या ते उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचा विद्यमान कार्यकाळ २५ नोव्हेंबरला संपत आहे. भाजपने एल. मुरुगन यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पुरी यांना उमेदवारी देण्याची घोषणा बुधवारी केली.

  • 29 Oct 2026 10:00 AM (IST)

    29 Oct 2026 10:00 AM (IST)

    Israel Election 2026: इस्रायलमध्ये निवडणुकीचा हायव्होल्टेज ड्रामा! ७६ वर्षांचे नेतान्याहू सत्ता टिकवणार की नवा नेता? 

    मध्य पूर्वेतील राजकीय आणि लष्करीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची (Israel Election 2026) मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून जगभराचे लक्ष आता निकालांकडे लागले आहे. दीर्घकाळ पंतप्रधानपद भूषवलेले ७६ वर्षीय बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) आपली सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार की इस्रायली जनता नवीन नेत्याची निवड करणार, यावरून राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. इस्रायलच्या १२० जागांच्या संसदेत (नेसेट - Knesset) बहुमत सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला किमान ६१ जागांची आवश्यकता असते. 

  • 29 Oct 2026 09:50 AM (IST)

    29 Oct 2026 09:50 AM (IST)

     CJP Support Congress CEC Protest: अभिजित दीपके यांच्या 'कॉकरोच जनता पार्टी'चा दिल्ली आंदोलनाला पाठिंबा

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. आगामी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत भव्य आंदोलनाची हाक काँग्रेसने दिली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, काँग्रेसच्या या देशव्यापी आंदोलनाला आता कॉकरोच जनता पार्टीने (CJP) उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे.

    निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मुख्य आयुक्तांवर आक्षेप घेत काँग्रेसने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत तीव्र आंदोलनाची तयारी केली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि संयोजक अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसच्या या आंदोलनाला आपला पक्ष संपूर्ण पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • 29 Oct 2026 09:40 AM (IST)

    29 Oct 2026 09:40 AM (IST)

    Severe Super Cyclone Warning: पुढील ७२ तासांत मानवाला धोक्याची घंटा ! शास्त्रज्ञांची झोप उडवणारे अरावैद्य वादळ धडकणार 

    पुढील ७२ तासांत जगभरातील हवामान शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर टाकणारी एक अत्यंत भयानक आणि थरारक माहिती समोर येत आहे. निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यात आजवर कधीही पाहिला गेला नाही असा अतिविनाशकारी संघर्ष पाहायला मिळू शकतो, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. येत्या काही तासांत निर्माण होणारी ही नैसर्गिक आपत्ती अत्यंत अकल्पनीय आणि रौद्र रूप धारण करणार असून, जागतिक स्तरावरील हवामान अभ्यासकांच्या चिंतेत यामुळे मोठी वाढ झाली आहे.

  • 29 Oct 2026 09:30 AM (IST)

    29 Oct 2026 09:30 AM (IST)

    Ravindra Jadeja ICC Ranking Slip Drop: रवींद्र जडेजाचे ४ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात!  

    भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला आयसीसी (ICC) ताज्या क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे. मागील काही काळापासून सलग सामने न खेळल्याचा थेट परिणाम त्याच्या रँकिंगवर झाला असून, कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील त्याचे अव्वल स्थान निसटले आहे.

    सलग चार वर्षांहून अधिक काळ कसोटी अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानी राहणाऱ्या रवींद्र जडेजाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सेनने त्याला पछाडत पहिले स्थान पटकावले आहे. टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या ईशान किशनलाही फटका बसला असून तो अव्वल स्थानावरून घसरून तिसऱ्या स्थानावर आला आहे.

  • 29 Oct 2026 09:20 AM (IST)

    29 Oct 2026 09:20 AM (IST)

    Nagpur Graduate MLC Election : RSSच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसचा सुरुंग; पदवीधर निवडणुकीत MVAचे धनराज वंजारी विजयी

    भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अटीतटीच्या सामन्यात भाजपला मोठा पराभवाचा झटका बसला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

    नागपूर हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) गड मानला जातो. याच पाडावावर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.अटीतटीच्या आणि अनेक फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर अखेर मविआचे उमेदवार धनराज वंजari यांनी विजयाची बाजी मारली.

  • 29 Oct 2026 09:10 AM (IST)

    29 Oct 2026 09:10 AM (IST)

    Pune MLC Election 2026: हर्षदा देशमुख अन् कौस्तुभ गावडेंच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रातील समीकरणे बदलली

    Pune MLC Election 2026: पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद मतदारसंघांच्या निकालाने राज्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा दिली आहे. शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळविल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे, तर पदवीधर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाने महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.  वाचा सविस्तर- 

     

  • 29 Oct 2026 09:00 AM (IST)

    29 Oct 2026 09:00 AM (IST)

    पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी करमाळ्याच्या PSI सह दोन कर्मचारी निलंबित

    करमाळा पोलीस कोठडीत असताना स्वतःला जखमी करून घेतलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय 38, रा. बिटरगाव, सांगवी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एका पीएसआयसह दोन पोलीस कॉन्स्टेबल अशा तिघांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू असून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस तपास अधिकाऱ्यांनी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजते.

    कृष्णा ज्ञानदेव मोहिते याच्याविरुद्ध त्यांच्या नातेवाईक असलेल्या महिलेने फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला 20 ऑक्टोबर 2026 ला अटक करण्यात आली होती.

Maharashtra to World Breaking News : 

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत विरोधी महाविकास आघाडीची मुसंडी; नागपुरात काँग्रेसच्या अभिजीत वंजारींचा मोठा विजय झाला.  कर्जत-भीमाशंकर अभयारण्यात सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात वातावरण तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली. जिओ प्लॅटफॉर्म्सचा ऐतिहासिक आयपीओ (Jio IPO) शेअर बाजारात तुफान प्रतिसादासह २१% पेक्षा जास्त प्रीमियमवर यशस्वीरीत्या लिस्ट झाला.

भारताने नवी दिल्लीत आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) महत्त्वाच्या बैठकीसाठी पाकिस्तानला अधिकृत निमंत्रण पाठवले. ‘अर्नब’ चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर ओडिशात हजारो नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, महाराष्ट्रात काही भागांत वादळी पावसाचा अलर्ट  अद्यापही कायम आहे, 

 ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांची गती तर पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.  आशियाई पॅरा गेम्समधील सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज यादवच्या दुर्दैवी निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 29 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • crime news
  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • national news
  • Sports News

संबंधित बातम्या

आधी त्रास, नंतर मारहाण अन् अखेर खून; एकतर्फी प्रेमातून महिलेला संपवलं
1

आधी त्रास, नंतर मारहाण अन् अखेर खून; एकतर्फी प्रेमातून महिलेला संपवलं

पुणे पोलिस दलात खळबळ! रेल्वेतून १२ किलो गांजाची तस्करी, अंमलदार अटकेत
2

पुणे पोलिस दलात खळबळ! रेल्वेतून १२ किलो गांजाची तस्करी, अंमलदार अटकेत

Cricket: विराज फराटेची वादळी खेळी! ७३ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयलने प्रतिस्पर्ध्यांला लोळवले
3

Cricket: विराज फराटेची वादळी खेळी! ७३ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयलने प्रतिस्पर्ध्यांला लोळवले

Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद
4

Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.