Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न, नवले पुलाजवळ थरार; नेमकं काय घडलं?

सिंहगड रस्त्यावर स्वतःला पोलिस असल्याचे सांगत एका व्यावसायिकाकडील तब्बल एक कोटी रुपयांची रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 20, 2026 | 03:51 PM
एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न, नवले पुलाजवळ थरार; नेमकं काय घडलं?

एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न, नवले पुलाजवळ थरार; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांना लुटत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड रस्त्यावर स्वतःला पोलिस असल्याचे सांगत एका व्यावसायिकाकडील तब्बल एक कोटी रुपयांची रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. दुचाकीवर पाठलाग करून कार अडवून “तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात,” अशी बतावणी करत आरोपींनी रोख रक्कम असलेल्या बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी हर्षवर्धन भूषण पवार (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार विक्रम चाकणकर, अमेय कार्ले, गणेश कदम आणि त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास हर्षवर्धन पवार हे त्यांचे सहकारी किरण आपटे यांच्यासोबत कारमध्ये नऱ्हे येथील एचडीएफसी बॅकेच्या दिशेने नवले ब्रिजवरून जात होते. कार विक्रम चाकणकर चालवित होता. त्यावेळी अचानकपणे दुचाकीरून काही जण आले त्यांनी कारला त्यांच्या दुचाक्या आडव्या घातल्या. यावेळी अमेय कार्ले हा कारजवळ येऊन, “आम्ही पोलिस आहोत. तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात, याची आम्हाला माहिती आहे,” असे सांगत कारचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी कारमधील हिरव्या रंगाची बॅग आणि आणखी एक बॅग ज्यात एकूण एक कोटी रूपये होते ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकार केल्याने आरोपींचा डाव फसला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मुळात चाकणकर, अमेय कार्ले, गणेश कदम आणि बटर उर्फ गाडे या कटात सहभागी असल्याने चाकणकरने गाडी राजगड पोलिस ठाण्यात नेली. परंतु, राजगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांना हा लुटीचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथे चाकणकर आणि कार्ले यांना ताब्यात घेऊन त्यांनी नऱ्हे पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी उपनिरीक्षक घाडगे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : लुटमारीला विरोध महागात! ऑटोचालकावर सपासप वार; जागीच मृत्यू, नागपुरात खळबळ

कटाचा सूत्रधार कोण ? चर्चांना उधाण

विक्रम चाकणकरची व्यावसायिक पवार यांच्याशी पूर्वीपासून ओळख होती. पवार यांच्या आर्थिक व्यवहारांची त्याला सविस्तर माहिती होती. त्यातूनच इतर आरोपींशी संगनमत करून हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत लुटीचा प्रयत्न फसल्यानंतर चाकणकर पवार यांना राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घेऊन गेला. मात्र, चाकणकरने पवार यांना तेथे नेमके कोणाच्या सांगण्यावरून नेले, तसेच या चुकीच्या हालचालींची माहिती पोलिस निरीक्षक जाधव यांना कशी मिळाली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. आरोपींना अखेरीस नऱ्हे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असले, तरी या प्रकरणाबाबत विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे. काहीजणांकडून एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा आणि एका कथित पत्रकाराचा या प्रकरणाशी संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या दाव्यांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच, या दोघांनीच हे प्रकरण राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिटवता येईल, असा विश्वास आरोपींना दिला होता का, याचाही तपासातून खुलासा होणे अपेक्षित आहे.

Web Title: The police have arrested the accused who attempted a robbery near navale bridge in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
3

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.