Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Employees Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीचा मुद्दा ऐरणीवर; प्रताप सरनाईक यांना २० हजारांसाठी निवेदन

ST Employees Diwali Bonus: महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात संघटनेने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले. आता राज्य सरकार आणि एसटी महामंडळ या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 22, 2026 | 01:29 PM
एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीचा मुद्दा ऐरणीवर; प्रताप सरनाईक यांना २० हजारांसाठी निवेदन

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीचा मुद्दा ऐरणीवर; प्रताप सरनाईक यांना २० हजारांसाठी निवेदन

Follow Us
Follow Us:
  • एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळणार?
  • एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून २० हजार रुपये देण्याची मागणी
  • महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
ST Employees Diwali Bonus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना निवेदन देण्यात आले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे.(ST Employees Diwali Bonus)

कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी…

एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील लाखो प्रवाशांना दररोज परिवहन सेवा पुरवली जाते. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रवाशांची वाहतूक करण्याची महत्त्वाची जबाबदारी एसटी कर्मचारी पार पाडतात. चालक, वाहक तसेच विविध विभागांतील कर्मचारी प्रवाशांना सेवा देण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने मांडली आहे.

MSRTC employees: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष? मुख्यमंत्र्यांना ‘खारा दिवाळी फराळ’ पाठवण्याचा संघटनेचा इशारा

वाढती महागाई आणि इतर आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या दिवाळी भेटीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी भेट म्हणून २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना देण्यात आले.

दरवर्षी दिवाळीनिमित्त आर्थिक स्वरूपात भेट

मंत्री प्रताप सरनाईक हे मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आले असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन हे निवेदन सादर केले. एसटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त आर्थिक स्वरूपात भेट दिली जाते. मात्र, यंदा वाढलेली महागाई लक्षात घेता कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दिवाळी भेटीच्या रकमेत वाढ करणे आवश्यक आहे. राज्यातील इतर आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या रकमेच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांनाही सन्मानजनक रक्कम मिळावी, अशी भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे.

यंदा ६ नोव्हेंबर २०२६ पासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने, सणापूर्वीच ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि दिवाळी भेटीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्यासह संतोष गायकवाड, राजेंद्र वाहटूळे, बालाजी जाधव, डेनिस फर्नांडिस, दीपक म्हात्रे, संदीप गोसावी, दीपक म्हात्रे, धनंजय पाटील, सुगंधा हिले, विधी पवार, नीलम रोकडे, सुमन ढेबरे, धीरज म्हात्रे आणि हनुमंत पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार?

एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीचा प्रश्न आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मांडण्यात आला आहे. त्यामुळे सरकार या मागणीचा विचार करून कर्मचाऱ्यांना दिलासा देणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दिवाळीपूर्वी निर्णय झाल्यास राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सण साजरा करण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकते.

MSRTC Fare Hike: ‘एसटी तोट्यात असली तरी…’, १५ टक्के भाडेवाढीसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: . एसटी कर्मचाऱ्यांसाठी काय मागणी करण्यात आली आहे?

    Ans: एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून २० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीसाठी कोणाकडे निवेदन देण्यात आले आहे?

    Ans: महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.

  • Que: एसटी कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये दिवाळी भेट मिळणार का?

    Ans: सध्या ही कर्मचारी संघटनेची मागणी आहे. राज्य सरकार किंवा एसटी महामंडळाकडून याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला नाही.

Web Title: Maharashtra st employees demand 20000 diwali bonus pratap sarnaik sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • maharashtra
  • msrtc
  • pratap sarnaik
  • ST Employees

संबंधित बातम्या

भाजप नेते पाशा पटेल यांना न्यायालयाकडून दिलासा; ‘या’ प्रकरणातून झाली सुटका
1

भाजप नेते पाशा पटेल यांना न्यायालयाकडून दिलासा; ‘या’ प्रकरणातून झाली सुटका

Mira Bhayandar मध्ये ‘मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर, The Maharashtra Front’चे बॅनर झळकले; ‘लढा महाराष्ट्रीय धर्माचा’ घोषणेची चर्चा
2

Mira Bhayandar मध्ये ‘मी शिव-फुले-शाहू-आंबेडकर, The Maharashtra Front’चे बॅनर झळकले; ‘लढा महाराष्ट्रीय धर्माचा’ घोषणेची चर्चा

Sanjay Gandhi National Park : रानडुकराच्या शिकारीत गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू लपवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र
3

Sanjay Gandhi National Park : रानडुकराच्या शिकारीत गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू लपवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र

Jayant Patil: ‘पाच हजारांची मदत अत्यल्प; शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने हात मोकळे सोडावेत’, जयंत पाटील यांची मागणी
4

Jayant Patil: ‘पाच हजारांची मदत अत्यल्प; शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने हात मोकळे सोडावेत’, जयंत पाटील यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.