Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले

पुणे तसेच पिंपरी चिंचवड भागात घडलेल्या विषारी दारू मृत्यूकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या ऊरळी कांचन पोलिसांनी थरारकरित्या पाठलाग करून जेरबंद केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 27, 2026 | 11:49 AM
विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले
Follow Us
Follow Us:
  • विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई
  • मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले
  • दाढी काढून अन् मळकट कपडे घालून वावरत होता
पुणे : पुणे तसेच पिंपरी चिंचवड भागात घडलेल्या विषारी दारू मृत्यूकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या ऊरळी कांचन पोलिसांनी थरारकरित्या पाठलाग करून जेरबंद केले आहे. ऊरळी कांचन भागात ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी बाळू लोंढे हा फरार काळात आपला लूक बदलून वावरत होता. नेहमी दाढी-मिश्या वाढवून तसेच कपाळावर टिळा लावून वावरणारा बाळू आता दाढी काढून अन् मळकट कपडे घालून वावरत होता.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे. याप्रकरणात आतापर्यंत १० ते १२ आरोपींना अटक केली आहे. सध्या ते सर्व आरोपी न्यायालयीन कोठीत आहेत. तर, या रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांचा शोध सीआयडीची पथके घेत आहेत. हा प्रकार २६ ते २८ मे या कालावधीत दापोडी तसेच हडपसर परिसरात घडला होता. दारू मृत्यूकांडामुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

तपासात आरोपींकडून जप्त केलेले मोबाइल फोन आणि इतर तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. दरम्यान या दारू मृत्यूकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे गुन्ह्यानंतर फरार झाला होता. सीआयडी, तसेच पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो मे महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. ऊरळी कांचन पोलिसांना बाळू लोंढे हा लोणी काळभोर तसेच ऊरळी कांचन या भागात असल्याची माहिती मिळाली होती.

हे सुद्धा वाचा : सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

तपासाला महत्वाचे वळण; धागेदोरे शोधण्याचे काम

बाळू लोंढे याच्या अटकेमुळे दारू मृत्यूकांडाच्या तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणात त्याची भूमिका, दारूचा पुरवठा, संबंधित व्यक्ती तसेच मृत्यूकांडामागील संपूर्ण साखळी याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील अन्य आरोपी आणि संबंधितांचे धागेदोरे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

Web Title: The police have arrested the main accused in the illicit liquor case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस
1

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा
2

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
3

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या
4

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.