Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुकान फोडून साहित्य चोरणारा अटकेत; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

रंगाचे दुकान फोडून त्यातील साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्यास सातारा शहर डीबी पथकाने २४ तासांत जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2025 | 12:05 PM
दुकान फोडून साहित्य चोरणारा अटकेत; तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त

दुकान फोडून साहित्य चोरणारा अटकेत; तब्बल 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : रंगाचे दुकान फोडून त्यातील साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्यास सातारा शहर डीबी पथकाने २४ तासांत जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुदीप संजय मेंगळे (रा. सोनगाव (कुडाळ), ता. जावली, जि. सातारा. सध्या रा. कोयना सोसायटी, सदर बाजार, सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पुणे-सातारा महामार्गावरील महिंद्रा हॉटेलच्या शेजारील रंगवाला नावाच्या रंगाचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील लॅपटॉप, प्लंबिंग साहित्य तसेच इतर साहित्य चोरून नेले होते. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सातारा शहर डीबी पथकाने गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती काढून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी केली. त्यातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चोरीबाबत विचारपूस केली असता त्याने ही चोरी केली असल्याचे सांगितले.

अन्य ठिकाणाहून देखील तांब्याचा पाणी तापवण्याचा बंब चोरी केला असल्याचे सांगितले. हा माल त्याने विक्री करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणी लपवून ठेवला होता. तो पोलिसांनी हस्तगत केला असून त्याच्याकडून एकूण १ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांवर यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल असून, त्याने आणखीन कोठे चोरी केली आहे का, याबाबत अधिक तपास सुरू आहे. हा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केवळ २४ तासांमध्ये उघडकीस आणून आरोपीस अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, महेंद्र पाटोळे, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी सहभाग घेतला.

महिलेच्या पर्समधून सव्वा लाखांचे दागिने चोरले

पुण्यातील खडकी बाजार परिसरात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील २ लाख २७ हजारांचे दागिने चोरून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, पैसे देण्यासाठी पर्स काढल्यानंतर ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात ४१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: The police have arrested the person who broke into the shop and stole material nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Satara Crime
  • Satara Police

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…
1

Maharashtra Politics: राजकारण खालच्या थराला! एकनाथ शिंदेंच्या उमेदवारावर हल्ला; चाकू भोकसला अन् थेट…

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन
2

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ
3

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड
4

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.