Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

डेक्कन जिमखाना भागातील फ्लाईंग जिप्सी हॉटेलसमोर तरुणाच्या डोक्यात शस्त्राने वार करुन त्याला मारहाण केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी दोन तरुणींसह साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 17, 2026 | 12:30 AM
डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. डेक्कन जिमखाना भागातील फ्लाईंग जिप्सी हॉटेलसमोर तरुणाच्या डोक्यात शस्त्राने वार करुन त्याला मारहाण केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी दोन तरुणींसह साथीदाराला अटक करण्यात आली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अथर्व प्रमोद जगताप (वय १९, रा. ऑरा सोसायटी, शिवसृष्टीजवळ, आंबेगाव) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी माधवी कुंभार (रा. काळेपडळ, हडपसर), स्नेहल सोनके (रा. पिंपळे गुरव), शार्दुल ओव्हाळ (रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या सात ते आठ जणांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जगताप याने डेक्कन पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणी आणि तक्रारदार अथर्व जगताप हे ओळखीचे आहेत. सातारा येथे त्यांची काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. शनिवारी (१५ ऑगस्ट) पहाटे सव्वातीनच्या सुमारास अथर्व हा फ्लाईंग जिप्सी हॉटेलमधून बाहेर पडत होता. त्यावेळी टोळक्याने अथर्वला अडवले. ‘तू तरुणींना काय बोलला. आमच्याबरोबर चल तुला दाखवितो’, अशी धमकी दिली. अथर्व घाबरून हाॅटेलमध्ये पळाला. त्या वेळी आरोपी तरुणी आणि साथीदारांनी त्याला शिवीगाळ केली. ‘याला मारा, जिवंत सोडू नका’, अशी धमकी देऊन त्याच्या डोक्यात शस्त्राने वार केला. हाॅटेलमधील खुर्ची त्याला फेकून मारली, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

हे सुद्धा वाचा : भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

डेक्कन जिमखाना भागातील शिरोळे रस्त्यावर असलेले हॉटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याने यापूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. संबंधित हॉटेल मालकाविरुद्ध कारवाई केली होती. या हॉटेलच्या परिसरात यापूर्वी मारामारीच्या घटना घडल्या होत्या. रात्री अपरात्री तरुणांचा आवाजामुळे, गोंधळामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या होत्या.

हे सुद्धा वाचा : प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित

Web Title: The police have arrested three people for the attempted murder of a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
1

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
2

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.