Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Purnekar Murder Case: पतीची ७ वेळा चौकशी, आता थेट माजी महापौर! पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास ऐन वळणावर

Pradeep Purnekar Murder Case: शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठाण्यातून मोठी घडामोड समोर आली आहे! एसआयटीने माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. पतीची ७ वेळा चौकशी झाल्यानंतर आता थेट माजी महापौरांवरच चौकशीची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 27, 2026 | 11:30 AM
Pradeep Purnekar Murder Case

Pradeep Purnekar Murder Case

Follow Us
Follow Us:
  • एसआयटीने ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलावले
  • हत्येचा राजकीय कट रचल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पुरावा दिला
  • प्रकरणात आतापर्यंत ५ आरोपी जेदप, तर पतीची ७ वेळा चौकशी
Pradeep Purnekar Murder Case: शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येच्या तपासात एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या विद्यमान नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. आज, मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची एसआयटीने तब्बल सात वेळा कसून चौकशी केली असून, आता थेट माजी महापौरांनाच चौकशीच्या फेऱ्यात आणल्याने राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कार्यालयातच गोळ्या झाडून आणि चॉपरने वार करून हत्या

२९ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास मानपाडा येथील स्वतःच्या कार्यालयात बसलेले असताना प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला होता. पिस्तुलातून गोळ्या झाडत आणि चॉपरने सपासप वार करत त्यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. या हत्येमागे राजकीय आणि सामाजिक वैमनस्य कारणीभूत असल्याचा संशय पहिल्यापासूनच व्यक्त केला जात होता.

हेही वाचा: Guwahati Shooting News: गुवाहाटीत रक्ताचा पाठोपाठ! हॉटेलमध्ये बेछुट गोळीबार; महिलांसह ६ जणांच्या हत्येने खळबळ

पूर्णेकर कुटुंबाचे गंभीर आरोप; पुरवणी जबाबात थेट नाव

प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने नोंदवलेल्या पुरवणी जबाबात मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या नावांचा थेट उल्लेख केला होता. हा पूर्वनियोजित राजकीय कट असल्याचे सांगत शिंदे दाम्पत्याला या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी करण्याची मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी लावून धरली आहे. याबाबत पूर्णेकर कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत हत्येच्या दीड तास आधीचा एक व्हिडीओ समोर आणला आहे, ज्यामध्ये सर्व आरोपी राजेंद्र शिंदे यांच्यासोबत दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी आपल्यावरील हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

पाच आरोपींना बेड्या; सात वेळा झाली होती पतीची चौकशी

या गुन्ह्याचा तपास करताना एसआयटीने पूर्णेकर यांचा जुना मित्र सुभाष उर्फ पप्या शिंदे याच्यासह निखिल यादव, नितेश पवार आणि इतर दोन अशा एकूण पाच आरोपींना अटक केली असून, हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासाचा भाग म्हणून एसआयटीने ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात राजेंद्र शिंदे आणि मुख्य आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली होती.

सात वेळा झालेल्या या चौकशीत राजेंद्र शिंदे यांनी हत्येशी कसलाही संबंध नसल्याचा दावा केला होता. अखेर आज मीनाक्षी शिंदे यांना एसआयटीने चौकशीसाठी बोलवले असून, या चौकशीतून काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रदीप पूर्णेकर हे कोणत्या पक्षाचे नेते होते आणि त्यांची हत्या कधी झाली?

    Ans: प्रदीप पूर्णेकर हे शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख होते; २९ सप्टेंबर रोजी रात्री मानपाडा येथील कार्यालयात त्यांची हत्या झाली.

  • Que: एसआयटीने चौकशीसाठी कोणाला पाचारण केले आहे?

    Ans: एसआयटीने ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलवले आहे.

  • Que: या प्रकरणात आतापर्यंत किती आरोपींना अटक करण्यात आली आहे?

    Ans: या प्रकरणात आतापर्यंत मुख्य आरोपी सुभाष उर्फ पप्या शिंदे याच्यासह एकूण ५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Pradeep purnekar murder case thane sit summons former mayor meenakshi shinde sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • In Thane
  • Murder Case
  • Pradeep Purnekar
  • Thane Crime News

संबंधित बातम्या

पुरंदर तालुक्यात दुहेरी हत्याकांड! वृद्ध दाम्पत्याला धारदार शस्त्राने संपवलं; कारणही आलं समोर
1

पुरंदर तालुक्यात दुहेरी हत्याकांड! वृद्ध दाम्पत्याला धारदार शस्त्राने संपवलं; कारणही आलं समोर

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं! वसतिगृह परिसरात रक्तरंजित थरार; नेमकं काय घडलं?
2

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं! वसतिगृह परिसरात रक्तरंजित थरार; नेमकं काय घडलं?

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…
3

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी
4

दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.