Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : महिलेच्या कपाळावर चाकूने वार, चौघांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

दुचाकीवरून जाताना अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर शेजारी राहणाऱ्या चौघांनी एका महिलेसह तिच्या पती व आईला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 15, 2026 | 03:33 PM
महिलेच्या कपाळावर चाकूने वार, चौघांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

महिलेच्या कपाळावर चाकूने वार, चौघांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : दुचाकीवरून जाताना अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर शेजारी राहणाऱ्या चौघांनी एका महिलेसह तिच्या पती व आईला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी एका व्यक्तीने चाकूने महिलेच्या कपाळावर वार करुन तिला जखमी केले आहेत. ही घटना नारळीबाग परिसरात घडली आहे. सचिन उर्फ माया प्रदिप सोनवणे, दिक्षा अमोल भावसार, सोहम सोनवणे (सर्व रा. नारळीबाग) आणि सुवर्णा उर्फ गुड्डी पोटपिल्लेवार (रा. पावन चौक, नारळीबाग) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहे. त्यांच्याविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अश्विनी योगेश कोतवाल (वय २५, रा. नारळीबाग) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी या दुचाकीवरून परिसरातील किराणा दुकानासमोरून मेडिकलमध्ये जात होत्या. त्यावेळी शेजारी राहणारी दिक्षा भावसार हिने त्यांना थांबवून दुचाकी वेगात का चालवित आहेस, तसेच अंगावर पाणी का उडविले, असा जाब विचारला. त्यावरून वाद होऊन दिक्षाने शिवीगाळ करत अश्विनी यांना मारहाण केली. अश्विनी यांची आई व पती त्यांना सोडविण्यासाठी आले असता दिक्षासह तिचा भाऊ सचिन उर्फ माया सोनवणे, सोहम सोनवणे आणि सुवर्णा उर्फ गुड्डी पोटपिल्लेवार यांनीही तिघांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर सचिन उर्फ माया याने चाकूने अश्विनी यांच्या कपाळाच्या उजव्या बाजूला वार केला. यात त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. अश्विनी यांच्या पतीला फिट आल्याने दोघेही बेशुद्ध झाले. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर दोघांना रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केले. या घटनेनंतर चौघेही तेथून पसार झाले. सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : बारामती बसस्थानकाप्रमाणे पौड बसस्थानकाचे नूतनीकरण करा; मनसेचे सुहास निम्हण यांची मागणी

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत इककळकी याची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: The police have registered a case against four individuals for assaulting a woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sambhajinagar Crime

संबंधित बातम्या

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…
1

जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण; मारहाण करून सह्या घेतल्या अन्…

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद
2

रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…
3

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा
4

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.