
पुडीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर, तरुणावर चाकूने हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता सलूनसमोर बसलेल्या १८ वर्षीय मजुराकडे पुडीसाठी पैशांची मागणी करुन पैसे न भेटल्याने चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गारखेडा परिसरातील गणेशनगरात घडली आहे. गोपी व त्याचा एक साथीदार अशी चाकूने हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात कृष्णा बुद्धराम यादव (१८, रा. नवनाथ नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी हा १३ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजता दुकानाबाहेर बसलेला असताना गोपी व त्याच्या साथीदाराने पुडी घेण्यासाठी १०० रुपये मागितले. माञ कृष्णा याने पैसे नकार देताच दोघांनी त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर गोपीने गच्ची धरली तर त्याच्या साथीदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी गोपीने खिशातून चाकू काढून अंगावर धावून आला. कृष्णा याने चाकू पकडण्याचा प्रयत्न केला असता कृष्णाच्या डाव्या हाताची तीन बोटे कापली गेली. घाटीत उपचारांनंतर कृष्णा यादव याने पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार बावस्कर करीत आहेत.
व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला
व्यवसायासाठी एक लाख रुपये देण्यास नकार दिल्याच्या रागातून चुलतीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, त्यांच्या कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जखमी महिलेचे नाव गुणवंती सुरेश सुराणा (वय ६६) असे आहे. त्यांनी खडक पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचा पुतण्या दिनेश जुगराज सुराणा (वय ५८) आणि फर्मान मन्सूर पारकर (वय २८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पुण्यातील एकबोटे कॉलनी परिसरात घडली आहे.
हे सुद्धा वाचा : पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित