Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या पैशातून खरेदी केलेली तब्बल ५५ लाख १६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गोठवली आहे. पुणे जिल्ह्यात २०२६ मधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2026 | 05:07 PM
अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

Follow Us
Follow Us:

पिंपरी : अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून कमावलेल्या पैशातून खरेदी केलेली तब्बल ५५ लाख १६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गोठवली आहे. सांगवी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या या मालमत्तेवर NDPS Act मधील कलम 68F(1) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात २०२६ मधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५९६/२०२५ दाखल असून, या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लावण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी ५५.२९ ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त केले होते. या प्रकरणातील टोळीप्रमुख जुनेद अफजल खान आणि त्याची पत्नी फौजिया सुलेमान साटी/खान यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली.

तपासादरम्यान पुरंदर तालुक्यातील गराडे येथील गट क्रमांक २२७४ मधील तीन गुंठे (३ हजार चौ.फूट) जमीन आणि त्यावरील बांधकाम, अशी सुमारे ५५ लाख १६ हजार रुपये किमतीची मालमत्ता त्यांच्या नावावर असल्याचे समोर आले. ही मालमत्ता अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मिळालेल्या पैशातून खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ यांनी उपलब्ध पुराव्यांसह सक्षम प्राधिकारी, मुंबई यांच्याकडे मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव सादर केला. सुनावणीदरम्यान संबंधितांनी ही मालमत्ता कायदेशीर उत्पन्नातून मिळवल्याचा ठोस पुरावा सादर केला नाही. त्यामुळे २ सप्टेंबर २०२६ रोजी सक्षम प्राधिकरणाने सदर मालमत्ता अमली पदार्थांच्या अवैध व्यापारातून मिळविल्याचे मान्य करत फ्रीझिंग आदेश कायम केला. आदेशानुसार सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय या मालमत्तेचे हस्तांतरण किंवा कोणताही व्यवहार करता येणार नाही.

हे सुद्धा वाचा : भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाला महापालिकेची मंजुरी; 12 हजार 937 कोटींच्या आराखड्यास मान्यता

अवैध संपत्तीवरही पोलिसांचा प्रहार

अमली पदार्थांची विक्री करून पैसा कमावणाऱ्यांविरोधात केवळ गुन्हे दाखल करून थांबणार नसून, त्या पैशातून उभारलेल्या आर्थिक साम्राज्यावरही कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे. जमीन, घर, बांधकाम अथवा अन्य मालमत्ता अमली पदार्थांच्या पैशातून संपादित केल्याचे आढळल्यास कायद्यानुसार फ्रीझिंग, जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ सचिन कदम यांनी केली.

Web Title: The police have taken major action against assets amassed using money from the drug trade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • crime news
  • Drugs
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाला महापालिकेची मंजुरी; 12 हजार 937 कोटींच्या आराखड्यास मान्यता
1

भक्ती-शक्ती चौक ते चाकण मेट्रो मार्गाला महापालिकेची मंजुरी; 12 हजार 937 कोटींच्या आराखड्यास मान्यता

पायाभूत सुविधा अन् नागरी सेवांच्या बळकटीकरणाला वेग; पिंपरी-चिंचवडच्या स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी
2

पायाभूत सुविधा अन् नागरी सेवांच्या बळकटीकरणाला वेग; पिंपरी-चिंचवडच्या स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक
3

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral
4

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.