Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांच्या ‘धिंड पॅटर्न’ला ब्रेक! अटक आरोपींचे फोटो-व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासही बंदी

गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून राबविला जाणारा 'धिंड पॅटर्न' वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी नरमाईचे धोरण स्विकारले आहे. पोलीस आयुक्तांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 08, 2026 | 01:54 PM
पुणे पोलिसांच्या 'धिंड पॅटर्न'ला ब्रेक! अटक आरोपींचे फोटो-व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासही बंदी

पुणे पोलिसांच्या 'धिंड पॅटर्न'ला ब्रेक! अटक आरोपींचे फोटो-व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासही बंदी

Follow Us
Follow Us:

पुणे : गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून राबविला जाणारा ‘धिंड पॅटर्न’ वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी नरमाईचे धोरण स्विकारले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अटक आरोपींच्या वागणुकीसंदर्भात कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोपींचा सार्वजनिक अपमान होईल, अशा कोणत्याही प्रकारची वागणूक देऊ नये, तसेच त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांबरोबरच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ आणि महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाच्या आदेशांचा संदर्भ देत हे परिपत्रक काढण्यात आले आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील एका प्रकरणातील अल्पवयीन आरोपींची कथित धिंड काढणे आणि अपमानास्पद वागणूक दिल्याच्या घटना तसेच लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपींची भररस्त्यात गुडघ्यावर बसवून काढलेल्या धिंडीनंतर राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली. नुकतेच आयोगाच्या समितीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात येऊन संबंधित अधिकारी यांचे जबाब नोंदवले. नोंदी तसेच सीसीटीव्ही आणि व्हायरल व्हिडीओची चौकशी केली. संबंधित प्रकरणाचा अंतिम अहवाल आयोगाला सादर केला जाणार आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलिस ठाणे, शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. परिपत्रकानुसार, कोणत्याही आरोपीची धिंड काढणे, सार्वजनिक अपमान होईल अशा पद्धतीने फिरविणे किंवा हातपाय बांधून मिरविणे यावर स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. अटक ते न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायद्यानुसार आणि मानवी हक्कांचा सन्मान राखूनच कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, अशा प्रकारच्या घटना घडल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस आयुक्तांनी दिला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सूचनांची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करून त्याची नियमित नोंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…

आयुक्तांच्या प्रमुख मार्गदर्शक सूचना

  • आरोपीची धिंड काढणे किंवा सार्वजनिक अपमान होईल अशी वागणूक देऊ नये.
  • आरोपीचे फोटो, व्हिडिओ किंवा दृश्यफिती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
  • अटक ते न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बीएनएसएस-२०२३ व मानवी हक्क आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.
  • नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

Web Title: The pune police have now decided not to parade the accused in public

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…
1

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…

एफआरपीची चुकीची आकडेवारी देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा; साखर आयुक्तांकडे मागणी
2

एफआरपीची चुकीची आकडेवारी देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा; साखर आयुक्तांकडे मागणी

Maharashtra Breaking News Live Updates Today: प्रशांत किशोर यांच्या अटीमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी 
3

Maharashtra Breaking News Live Updates Today: प्रशांत किशोर यांच्या अटीमुळे राष्ट्रवादीत नव्या वादाची ठिणगी 

थकीत ऊसबिल अन् रिकव्हरी चोरीवरुन राजू शेट्टी आक्रमक; साखर आयुक्तांकडे केल्या ‘या’ मोठ्या मागण्या
4

थकीत ऊसबिल अन् रिकव्हरी चोरीवरुन राजू शेट्टी आक्रमक; साखर आयुक्तांकडे केल्या ‘या’ मोठ्या मागण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.