Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AAP Sarpanch Son Teerth Singh Shot Dead:पंजाबमध्ये ‘आप’ सरपंचाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या!; जुन्या वैमनस्यातून ८ गोळ्या झाडल्या

१३ ऑक्टोबर रोजी पंजाबमधील ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परमिंदर झोटा यांची हत्या झाली होती. मानसा येथील गजबजलेल्या बाजारात मेडिकल स्टोअरचा मालक अश्विनी कुमार याने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 27, 2026 | 02:47 PM
Punjab News, Crime News, AAP, Amritsar, National News

Punjab News, Crime News, AAP, Amritsar, National News

Follow Us
Follow Us:
  • चीते कलान गावात ‘आप’ सरपंचाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या.
  • जुन्या वैमनस्यातून तीर्थ सिंगवर हल्ला
  • मृत तरुणाचा मित्र रणजित सिंग गोळीबारात जखमी
AAP Sarpanch Son Teerth Singh Shot Dead: पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील चीते कलान गावात एका मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृत तरुण हा आम आदमी पार्टी (आप) च्या सरपंचाचा मुलगा तीर्थ सिंग असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता घडली, जेव्हा तीर्थ सिंग आपला मित्र रणजित सिंग याच्यासोबत नमन करण्यासाठी आला होता. काही गावकऱ्यांसोबतच्या जुन्या वैमनस्यातून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी अंदाजे ७ ते ८ गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. तीर्थ सिंगला दोन गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाला. रणजित सिंगच्या मांडीला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Murder Case: अहिल्यानगरमध्ये १० वर्षांच्या प्रेमसंबंधाचा थरारक अंत! ग्रामपंचायत कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याची हत्या

चार जणांना अटक

पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींची ओळख पटवली आहे: गुरजंत, गोरा, हरकीरत उर्फ ​​हॉकी आणि गुरदित सिंग. पोलिसांनी या आरोपींविरुद्ध नावे नमूद करून एफआयआर दाखल केला असून, त्यांना अटक करण्यासाठी वेगवेगळी पथके छापे टाकत आहेत.

तीर्थ सिंगचा भाऊ ब्लॉक समितीचा सदस्य आणि त्याची आई सरपंच

मृत तीर्थ सिंगच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी आहे. त्याचा भाऊ ब्लॉक समितीचा सदस्य आहे, तर त्याची आई गावची सरपंच आहे. अमृतसर ग्रामीणचे एसएसपी, कवलप्रीत सिंग चहल यांनी सांगितलं. प्राथमिक तपासानुसार हे टोळीयुद्ध नसून वैयक्तिक वैमनस्याचे प्रकरण आहे. आरोपीला लवकरच अटक करण्याचे प्रयत्न पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Dhule Accident News: धुळ्यात मोठी दुर्दैवी घटना! सहामाही परीक्षा संपताच नदीत पोहायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्य

यापूर्वी, १३ ऑक्टोबर रोजी पंजाबमधील ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परमिंदर झोटा यांची हत्या झाली होती. मानसा येथील गजबजलेल्या बाजारात मेडिकल स्टोअरचा मालक अश्विनी कुमार याने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. परमिंदर झोटा हे मानसा भागातील रहिवासी होते आणि ते अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात आवाज उठवत होते.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात कोणती दुर्दैवी घटना घडली आहे?

    Ans: अमृतसरच्या चीते कलान गावात आम आदमी पक्षाच्या (AAP) सरपंचाचा मुलगा तीर्थ सिंग याची जुन्या वैमनस्यातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

  • Que: या गोळीबारात कोणी जखमी झाले आहे का?

    Ans: होय, मृत तीर्थ सिंग यांचा मित्र रणजित सिंग याच्या मांडीला गोळी लागल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Que: पोलिसांनी याप्रकरणी किती आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: पोलिसांनी गुरजंत, गोरा, हरकीरत उर्फ हॉकी आणि गुरदित सिंग या ४ आरोपींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे.

Web Title: National punjab amritsar aap sarpanch son shot dead cheete kalan as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • AAP
  • amritsar
  • crime news
  • national news
  • Punjab News

संबंधित बातम्या

शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू
1

शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू

चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक
2

चिमुरडीच्या हातापायांवर सिगारेटचे चटके, डोक्याचे केसही कापले; आरोपी वडिलांना अटक

Guwahati Shooting News: गुवाहाटीत रक्तरंजीत थरार! हॉटेलमध्ये बेछुट गोळीबार; महिलांसह ६ जणांच्या हत्येने खळबळ
3

Guwahati Shooting News: गुवाहाटीत रक्तरंजीत थरार! हॉटेलमध्ये बेछुट गोळीबार; महिलांसह ६ जणांच्या हत्येने खळबळ

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीध निवडणुकीचे आज निकाल जाहीर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.