Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने हनीट्रॅपचा डाव उधळला; दोघी महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल

तरुणाला हनीट्रॅपमध्ये अडकवून ५० हजार रुपयांची मागणी करत आर्थिक खंडणी उकळण्याचा डाव शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 25, 2026 | 06:10 PM
शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने हनीट्रॅपचा डाव उधळला; दोघी महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने हनीट्रॅपचा डाव उधळला; दोघी महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून एका २३ वर्षीय तरुणाची ओळख वाढवून, त्याच्याशी अश्लील स्वरूपाच्या चर्चा करत त्याला विविध आमिषे दाखवून शिक्रापूर येथे बोलावून घेण्यात आले. त्यानंतर त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून ५० हजार रुपयांची मागणी करत आर्थिक खंडणी उकळण्याचा डाव शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी शितल संजय डाके (रा. करंजेनगर, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे), वैष्णवी आकाश गायकवाड, आकाश चिंतामण गायकवाड (दोघेही रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) आणि शुभम कांडगे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्रावण गुपचे आणि योगेश आव्हाड हे २३ ऑगस्ट रोजी रात्री गस्त घालत असताना शिक्रापूर बसस्थानकाजवळ दोन तरुण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना हटकून घरी जाण्यास सांगितले. काही वेळाने पोलिसांचे पथक पुन्हा त्याच ठिकाणी आले असता दोन्ही तरुण तेथेच उभे असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची पुन्हा चौकशी केली. यावेळी त्यापैकी एका तरुणाने घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांकडे मदतीची मागणी केली.

 ५० हजारांची मागणी; खोट्या गुन्ह्याची धमकी

पोलिसांनी तरुणाला धीर देत सविस्तर विचारपूस केली असता, शितल डाके आणि वैष्णवी गायकवाड या महिलांसह काही तरुणांशी सोशल मीडियावरून त्याची ओळख झाली असल्याचे त्याने सांगितले. या व्यक्तींनी त्याच्याशी अश्लील स्वरूपाच्या विविध चर्चा केल्या आणि त्याला शिक्रापूर येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देण्याची तसेच त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचे तरुणाने पोलिसांना सांगितले.

हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत वाद, महिलेने दगडाने ठेचून एकाला संपवलं; पुणे जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

पोलिसांनी संशयितांना घेतले ताब्यात

घटनेची माहिती पोलीस हवालदार श्रावण गुपचे यांनी तातडीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तरुणाला हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला व युवकांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांचे मोबाईल फोन जप्त करून त्यांची चौकशी केली असता संपूर्ण हनीट्रॅपचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित २३ वर्षीय युवकाने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संबंधित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन काळे करीत आहेत.

Web Title: The shikrapur police have taken major action by foiling a honey trap plot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar News : कैलास कॉलनी फायरिंग तपासात ‘खाकी कनेक्शन’; पोलीस शिपाई सुभाष घाडगे निलंबित
1

Ulhasnagar News : कैलास कॉलनी फायरिंग तपासात ‘खाकी कनेक्शन’; पोलीस शिपाई सुभाष घाडगे निलंबित

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या
3

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
4

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.