Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती एमआयडीसी परिसरात चोरीच्या घटना; अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक अटकेत

पहिल्या घटनेत डायनामिक्स कंपनीच्या आवारातून १३ मार्च रोजी सोलर प्लांटला जोडलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीस गेली होती. याबाबत १६ मार्च रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2026 | 03:42 PM
धक्कादायक ! जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या; अनैतिक संबंधास आड येत असल्याने काढला काटा

धक्कादायक ! जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या; अनैतिक संबंधास आड येत असल्याने काढला काटा

Follow Us
Follow Us:

बारामती : एमआयडीसी परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी तपास करत उलगडा केला आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना अटकही करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत डायनामिक्स कंपनीच्या आवारातून १३ मार्च रोजी सोलर प्लांटला जोडलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीस गेली होती. याबाबत १६ मार्च रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.

चोरीचा माल त्यांनी भंगार व्यावसायिक मोहम्मद शब्बीर मोहम्मद बशीर अन्सारी (वय ३८) याला विकल्याचे निष्पन्न झाले. बारामती तालुका पोलिसांनी अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली असून, अन्सारी याला अटक करण्यात आली आहे. एकूण १३ किलो तांब्याची तार जप्त करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत ३ मार्च रोजी एमआयडीसी परिसरातील हिरकणी रियल इस्टेट प्रा. लि. यांच्या गोदामातून एकूण ६ लाख ५ हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेला होता. यामध्ये सुमारे २ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिकल केबल, ५० हजार रुपये किमतीचे पाण्याचे फिटिंग साहित्य, १५ हजार रुपये किमतीचा आरओ तसेच सुमारे ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा व ट्रान्सफॉर्मर ऑईलचा समावेश आहे.

या प्रकरणी मच्छिंद्र प्रदीप गव्हाळे, राजू रामा दिवटे, संजय रामा दिवटे आणि सनी भारत पाथरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजू रामा दिवटे, संजय रामा दिवटे यांना ५ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना ०२ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे सुरू आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर वीर राहुल मखरे हे चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय परिषदारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ भारत खारतोडे किशोर वीर राहुल मखरे जितेंद्र शिंदे मनोज पवार राहुल लांडगे सचिन तरंगे आफरीन शेख यांनी केली आहे.

Web Title: Theft incidents in baramati midc area scrap dealers arrested along with minors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • baramati news
  • crime news

संबंधित बातम्या

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली
1

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

Crime News: मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश! २३ कोटींची मालमत्ता जप्त तर ९ जणांना DRI कडून अटक
2

Crime News: मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश! २३ कोटींची मालमत्ता जप्त तर ९ जणांना DRI कडून अटक

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!
3

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…
4

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.