Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…

कोथरूडमधील कुविख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्या टोळीतील सराइत गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दरम्यान, गँगस्टर निलेश घायवळ परदेशात फरार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2026 | 05:58 PM
नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्...

नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांकडूनही कारवाई सुरु आहे. अशातच आता कोथरूडमधील कुविख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्या टोळीतील सराइत गुन्हेगाराला कोथरूड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दरम्यान, गँगस्टर निलेश घायवळ परदेशात फरार असून, त्याचा शोध अद्याप तरी पुणे पोलिसांना लागलेला नाही. नीलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्मा (वय ३८, रा. गुजरात काॅलनी, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शर्मा याच्याविरुद्ध कोथरूड पोलिस ठाणे, तसेच जामखेड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

 

कोथरूड गोळीबार प्रकरणात निलेश घायवळ याच्यासह साथीदारांवर पोलिसंनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली आहे. गु्न्हा दाखल झालेला घायवळ हा परदेशात असून, त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. घायवळ टोळीतील सराइत शर्मा हा गेल्या काही दिवसांपासून पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता.

हे सुद्धा वाचा : अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

शर्मा हा सुतार दवाखान्याजवळील मंडईत थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलिस कर्मचारी विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी, वैभव शीतलल यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलिस उपायुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरुण घोडके, गु्न्हे शाखेचे निरीक्षक अनिल माने, सुनील कारोटे, उपनिरीक्षक मोहन चव्हाण, मंगेश शेळके, मयूर पांढरे, श्रीकांत दगडे, दत्ता सोनवणे यांनी ही कामगिरी केली.

हे सुद्धा वाचा : सासवड पोलिसांची बोपगावात मोठी कारवाई; तब्बल 21 लाख 70 हजारांचा गुटखा जप्त

कृषी पंपांच्या केबल चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

जुन्नर, आंबेगाव आणि नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल वायर चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे १५० शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे केबल चोरीचे १२ गुन्हे उघडकीस आले आहेत. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील नदीपात्र परिसरात मागील काही दिवसांपासून कृषी पंपांच्या केबल वायर चोरीच्या घटना वाढल्या होत्या. ऐन उन्हाळ्यात सिंचनासाठी आवश्यक असलेल्या केबल चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Web Title: Pune police have arrested a fugitive gangster from the nilesh ghaywal gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune News: गणेश मंडळांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करा; विसर्जन मिरवणुकीतील नियमभंगावर कारवाईची मागणी
1

Pune News: गणेश मंडळांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करा; विसर्जन मिरवणुकीतील नियमभंगावर कारवाईची मागणी

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
3

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
4

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.