Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांस्कृतिक शहरात महिला नाहीत सुरक्षित; 7 महिन्यातील आकडा वाचून बसेल धक्का

सांस्कृतिक, सुसंस्कृत तसेच सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात तरुणी, महिला आणि चिमुकल्या सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आज पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या आकडेवारीतून समोर येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 05, 2024 | 11:56 AM
सांस्कृतिक शहरात महिला नाहीत सुरक्षित; 7 महिन्यातील आकडा वाचून बसेल धक्का

सांस्कृतिक शहरात महिला नाहीत सुरक्षित; 7 महिन्यातील आकडा वाचून बसेल धक्का

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : सांस्कृतिक, सुसंस्कृत तसेच सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात तरुणी, महिला आणि चिमुकल्या सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आज पहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांत महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या आकडेवारीतून समोर येत आहे.

पुण्यात दोनच दिवसांपूर्वी स्कूल व्हॅन चालकाकडून दोन चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली. यासोबतच १२ वर्षाच्या मुलीवर वर्षभरापासून वडिलच अत्याचार करत असल्याचेही दिसून आले. तर, गुरूवारी मध्यरात्री बोपदेव घाट परिसरात मित्रासोबत फिरण्यास गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याने शहरात खळबळ उडाली. या घटनेच्या दोन दिवस आधीच मित्रासोबत घाटात गप्पा मारत बसलेल्या तरुणीला धमकावत आणि अन्य साथीदारांना बोलवून मारून टाकण्याची धमकी देऊन कारमधून अपरहरण झाले. तिचा विनयभंग करण्यात आला. यासोबतच एका महाविद्यालयातच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात उघडकीस आले होते. या सर्व घटना पुण्याला लावल्या जाणाऱ्या बिरूदावलीला छेद देत आहेत.

शहरात गेल्या ७ महिन्यात (फेब्रुवारी ते ऑगस्ट) विनयभंगाच्या आणि अत्याचाराच्या तब्बल ७१५ घटनांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. धक्कादायक म्हणजे महिन्याला सरासरी लैंगिक अत्याचाराच्या ३० ते ३५ घटनांची नोंद होत आहे. तर, विनयभंगाच्या घटना या ६० ते ६५ घटना आहेत. शहरात फेब्रुवारी ते ऑगस्टमध्ये लैंगिक अत्याचाराचे २६५ तर विनयभंगाचे ४५० गुन्हे नोंदवले गेले आहेत. शहरातील महिला अत्याचाराच्या घटना पाहता खरेच पुणे महिलांसाठी सुरक्षित राहिले आहे का, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या ३६० घटना

गेल्या नऊ महिन्यात शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या तब्बल ३६० घटना घडल्या आहेत. त्यामुळे इथे खेळण्या-बागडण्याच्या वयातील मुली देखील सुरक्षित नसल्याचे वास्तव आहे. या मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. कधी घरातल्या व्यक्तींकडून त्या वासनेच्या शिकार होत आहेत तर कधी ओळखीतील व्यक्तींच्या अत्याचाराला बळी पडत आहेत. गेल्या ८ वर्षात अडीच हजार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे नोंदींवरून दिसून येत आहे.

Web Title: There has been a huge increase in incidents of violence against women in pune city nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 11:56 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Dharashiv News: धाराशिवच्या माविमचा राज्यात दुसरा क्रमांक, बचतगटांच्या बळावर महिलांची झेप
1

Dharashiv News: धाराशिवच्या माविमचा राज्यात दुसरा क्रमांक, बचतगटांच्या बळावर महिलांची झेप

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्…
2

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्…

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती, विकासकामांना स्थायीची मंजुरी; बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय
3

पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती, विकासकामांना स्थायीची मंजुरी; बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

चालत्या एक्सप्रेसवर पडला दरोडा! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन महिला प्रवाशांचं सोनं लुटलं
4

चालत्या एक्सप्रेसवर पडला दरोडा! पोलिसांच्या हातावर तुरी देऊन महिला प्रवाशांचं सोनं लुटलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.