Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचे उदाहरण घडले असून, एका सहाय्यक फौजदारासह अन्य चौघांनी मोक्याची कारवाई रद्द करण्यासाठी तब्बल ६५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 30, 2025 | 06:29 PM
पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचे उदाहरण घडले असून, एका सहाय्यक फौजदारासह अन्य चौघांनी मोक्याची कारवाई रद्द करण्यासाठी तब्बल ६५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागताच हा पोलीस पसार झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील १३ सराईत गुन्हेगारांवरील मोक्काची कारवाई रद्द करण्यासाठी ६५ लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांवर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात कोल्हापूर पोलिस मुख्यालयातील एका सहायक फौजदारासह हुपरीतील एका तरुणाचा समावेश आहे.

समीर अब्बास पानारी (३५, रा. महावीरनगर, हुपरी, ता. हातकणंगले), सतीश रामदास सावंत (५०, रा. उपळावी बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर), सहाय्यक फौजदार मिलींद बळवंत नलावडे (पोलिस मुख्यालय, कोल्हापूर), कमलेश रमेश कानडे (रा. लालबाग, मुंबई) आणि लाला उर्फ लालासाहेब ज्ञानेश्वर अडगळे (रा. अकलूज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत.

अकलूज परिसरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूरात कार्यालय असलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवला होता. ती कारवाई रद्द होऊ शकते. यासाठी ६५ लाख रुपये द्यावे लागतील, असा फोन मिलिंद नलावडे याने अकलूजमधील प्रदीप चंद्रकांत माने याला केला होता. त्यानंतर अकलूज पोलिसांनी या प्रकरणाची गोपनीय चौकशी करून माहिती घेतली असता खंडणीचा प्रकार उघडकीस आला. या घडामोडीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कायद्याचे रक्षण करायचे काम ज्यांच्यावर सोपवले आहे, त्यांच्याकडूनच खंडणीसारखे गंभीर गुन्हे घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

हे सुद्धा वाचा : 20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

अटकेच्या भीतीने वैद्यकीय रजा टाकून पसार

याबाबत माने याने दिलेल्या फिर्यादीचा तपास करताना अकलूज पोलिसांनी समीर याच्यासह आणखी चार संशयितांची नावे निष्पन्न केली. यात कोल्हापूर मुख्यालयातील सहायक फौजदार मिलिंद नलावडे याचे नाव समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. अटकेच्या भीतीने नलावडे हा वैद्यकीय रजा टाकून पसार झाल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

Web Title: There has been a stir after a case was registered against a policeman in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर
1

अजितदादांच्या मृत्यूमागील सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला कधी मिळणार? पुण्यात झळकले बॅनर

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!
3

Murder News: लग्नाच्या धामधुमीतच रक्ताचा सडा… २१ वर्षीय तरुणावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला; ५ जणांना अटक, रुग्णालयात तणाव!

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल
4

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; जिल्ह्यातील 12 सराईत गुन्हेगार तडीपार, अनेक गंभीर गुन्हे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.