Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे…

तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहून तिला लग्न करण्याचे वचन दिले. पण, उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर सलग दोन वर्षे तरुणीला टाळटाळ करून तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 26, 2026 | 11:12 AM
पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे...

पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे...

Follow Us
Follow Us:

पुणे : स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहून तिला लग्न करण्याचे वचन दिले. पण, उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर सलग दोन वर्षे तरुणीला टाळटाळ करून तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून आता उपनिरीक्षक झालेल्या या तरुणावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे.

 

याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव स्वदेश विजय चव्हाण (वय ३१) असे आहे. याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात ३१ वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केली आहे.

पलिसांच्या माहितीनुसार, स्वदेश व पिडीत तरुणी पुण्यातील वारजे माळवाडी भागात राहण्यास होते. ती एका बँकेत क्लर्क म्हणून नोकरी करत होती. तर, स्वदेश स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. दोघे दोन वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होते. स्वदेश याने तिला लग्न करू असे सांगितले होते. लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर तरुणी गर्भवती राहिली होती. तेव्हा स्वदेशने तिचा गर्भपात केला होता.

दरम्यान, नुकतीच स्वदेशची स्पर्धा परिक्षेतून पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. त्यानंतर त्याची नेमणूक मुंबई पोलिस दलात झाली. तो सध्या कुरार पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. दरम्यान, नोकरी लागल्यानंतर तरुणीने त्याला लग्नाबाबत विचारणा करायची. तेव्हा तो विषय टाळटाळ करू लागला. मार्च २०२६ मध्ये स्वदेशने तरुणीला लग्नास नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्यावरून तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास वारजे माळवाडी पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : धक्कादायक ! धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओही काढला अन्…

धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

कोलकातामध्ये गाडीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या अत्याचाराचे चित्रीकरणही केले आहे. याबाबत पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी सांगितले की, ‘भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घडल्या प्रकाराने पीडित मुलगी धक्क्यात असल्याने तिच्या कुटुंबीयांनी काही विलंबाने पोलिसांशी संपर्क साधला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी जबाब नोंदवण्यात आले असून, सर्व बाबींचा तपास सुरू आहे. तक्रारीत उल्लेख असलेल्या दुसऱ्या मुलीच्या भूमिकेचाही पोलीस तपास करत आहेत.

Web Title: There has been an incident of a police officer cheating a young woman in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
1

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
2

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
3

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
4

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.