धक्कादायक ! धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओही काढला अन्...
कोलकाता : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढत आहेत. असे असताना आता कोलकातामध्ये गाडीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या अत्याचाराचे चित्रीकरणही केले आहे.
याबाबत पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी सांगितले की, ‘भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घडल्या प्रकाराने पीडित मुलगी धक्क्यात असल्याने तिच्या कुटुंबीयांनी काही विलंबाने पोलिसांशी संपर्क साधला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी जबाब नोंदवण्यात आले असून, सर्व बाबींचा तपास सुरू आहे. तक्रारीत उल्लेख असलेल्या दुसऱ्या मुलीच्या भूमिकेचाही पोलीस तपास करत आहेत.
नेमक्या ठिकाणाची निश्चिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोलकाता येथील सरसुना पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुमारे एक महिन्यापूर्वी शहरातील बेहाला परिसरात दोन पुरुषांनी तिच्या मुलीला गाडीतून लिफ्ट दिल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. गाडीत मुलीचा एक ओळखीचा व्यक्तीही उपस्थित होता. आरोपींनी या लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण केले आणि नंतर पीडितेला धमकी देण्यासाठी त्या फुटेजचा वापर केला. तपास अधिकारी आरोपींची ओळख पटवण्याचा, घटनेत वापरल्या गेलेल्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिक्रापुरातही अत्याचाराचा प्रकार
दुसऱ्या एका घटनेत, वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहन अनिल पाटसकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काकाकडून मुलीवर अत्याचार
झारखंड येथून एक नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्या सख्ख्या मावशीच्या नवऱ्याने म्हणजेच काकाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घडलेली घटना झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी या प्रकरणी नराधम आरोपीला अटक केली आहे.
‘मला खुश कर, दोन काय दहा दिवस सुट्या देतो…’; कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचे लैंगिक शोषण






