Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २४ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 27, 2025 | 06:44 PM
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक बातमी समोर आली आहे. कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २४ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकऱणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूड भागात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांना मोबाइलवर संपर्क साधला होता. त्यांना एका मॅसेजद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. नंतर ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात काही रक्कम जमा केली. चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्यानंतर ज्येष्ठाचा विश्वास बसला.

चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी २४ लाख ४४ हजार रुपये जमा केले. मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच त्यांना मूळ मुद्दलही परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने अधिक तपास करत आहेत.

सोशल मीडियावरील ओळख महिलेला पडली महागात

सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने सीबीआय अधिकारी असल्याची बनावट ओळख सांगत महिलेचा विश्वास संपादन करून तिची चार लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने महिलेला लग्नाचे आमिषही दाखविले होते. वानवडीतील फातिमानगर येथील ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरू वानवडी पोलिसांत शिरीष जयंतीलाल गोहेल उर्फ चिराग मित्तल (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ जुलै २०२४ ते २३ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे.

मुकादमाने केली ऊस वाहतूकदाराची फसवणूक

ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून मुकादमाने ऊस वाहतूकदाराकडून ७ लाख ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ऊस वाहतूकदार रामचंद्र सीताराम चव्हाण (रा. चोभे पिंपरी, ता. माढा) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत उसतोड मुकादम संजय मानसाराम निकम (रा. खामखेडा, ता. देवळा, जि. नाशिक) याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: There has been an incident of a pune citizen being cheated with the lure of investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्…; नागपुरातील घटनेनं खळबळ
1

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, मामीने विरोध केला अन्…; नागपुरातील घटनेनं खळबळ

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले
2

अमरावतीमधील चाकूहल्ला प्रकरणाचा उलगडा; पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना पोलिसांनी पकडले

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश
3

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…
4

Ratnagiri Accident: काळ रात्रच जणू! मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात! ट्रकची बसला धडक अन् 16 प्रवासी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.