Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं! वसतिगृह परिसरात रक्तरंजित थरार; नेमकं काय घडलं?

यवतमाळ शहरातील जगत मंदिर परिसरातील वसतिगृहात शनिवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले आहे. दुहेरी हत्याकांडामुळे यवतमाळ शहरासह उमरसरा परिसरात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 26, 2026 | 12:45 PM
दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं! वसतिगृह परिसरात रक्तरंजित थरार; नेमकं काय घडलं?

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं! वसतिगृह परिसरात रक्तरंजित थरार; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • यवतमाळच्या जगत मंदिर परिसरातील वसतिगृहासमोर दोन गटांत वाद
  • अभय पाठोडे आणि गजानन जाधव यांचा मृत्यू
  • अवधूतवाडी पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू
यवतमाळ : यवतमाळ शहरातील जगत मंदिर परिसरातील वसतिगृहात शनिवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले आहे. धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात अभय ऊर्फ बित्तम पाठोडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या गजानन जाधव याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे यवतमाळ शहरासह उमरसरा परिसरात खळबळ उडाली आहे.

 

जगत मंदिर परिसरातील हॉस्टेलसमोरील मैदानात शनिवारी रात्री २ गटांमध्ये अज्ञात कारणावरून वाद झाला. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. धारदार शस्त्रांनी अभय याच्यावर प्राणघातक वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला अभय पाठोडे हा मूळचा घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील रहिवासी असून, सध्या उमरसरा परिसरात राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध गुन्हे दाखल होते. तसेच महाराष्ट्र धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्यासंबंधीच्या एमपीडीए कायद्यांतर्गत त्याच्यावर दोनदा कारवाई झाली होती. या हत्याकांडामागे पूर्ववैमनस्य होते की अचानक झालेला वाद जीवघेणा ठरला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे सुद्धा वाचा : दानोळीतील महेश दळवी खून प्रकरणाचा उलगडा, चार संशयितांना अटक; आठ दिवसांची पोलीस कोठडी

घटनास्थळी पोलिसांची धाव; संशयितांचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. हल्ल्यानंतर पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या संघर्षात नेमके किती जण सहभागी होते, हल्ल्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू

एकमेकांकडे पाहिल्याचा राग अन् थेट डोक्यावर वार

एकमेकांकडे पाहण्याच्या क्षुल्लक वादातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुशांत विलास ढिले (वय ३२, रा. भवानीमाता कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) आणि सचिन राजू मारणे (वय २७, रा. अचानक चौक, न्यू कोपरे गाव, उत्तमनगर) अशी आहेत. या प्रकरणी जखमी मुलाने उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांड कुठे घडले?

    Ans: यवतमाळ शहरातील जगत मंदिर परिसरातील वसतिगृहासमोरील मैदानात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडली.

  • Que: या हत्याकांडात कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: अभय ऊर्फ बित्तम पाठोडे याचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर गंभीर जखमी गजानन जाधव याचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: An incident involving the murder of two people has taken place in yavatmal nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू
1

अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…
2

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…

Husband Murder Case: विषाचा प्रयोग ठरला अपयशी! घाबरलेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने उरकली पतीची हत्या
3

Husband Murder Case: विषाचा प्रयोग ठरला अपयशी! घाबरलेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने उरकली पतीची हत्या

एकमेकांकडे पाहिल्याचा राग अन् थेट डोक्यावर वार; पुण्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी
4

एकमेकांकडे पाहिल्याचा राग अन् थेट डोक्यावर वार; पुण्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.