Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले

Mumbai Crime: मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनबाहेरील स्कायवॉकवर एक अत्यंत थरारक अन् संतापजनक घटना घडली आहे! पती-पत्नीच्या वादातून एका निर्दयी बापाने आपल्याच ९ महिन्यांच्या पोटच्या गोळ्याला स्कायवॉकवरून खाली फेकून दिले. चिमुकला गंभीर जखमी झाला असून सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 26, 2026 | 01:58 PM
Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले

Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून बापाने स्वतःच्या ९ महिन्यांच्या मुलाला स्कायवॉकवरून  दिले फेकून
  • जखमी ९ महिन्यांच्या आरववर सायन रुग्णालयात उपचार सुरू
  • पोलिसांनी आरोपी जाफर शेखला तात्काळ अटक केली

Mumbai Crime: पती-पत्नीमधील किरकोळ वादातून एका क्रूर बापाने आपल्याच अवघ्या ९ महिन्यांच्या निष्पाप पोटच्या गोळ्याला स्कायवॉकवरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घाटकोपर परिसरात घडली आहे. या भीषण घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या सायन रुग्णालयात वैद्यकीय उपचाराची शर्थ सुरू आहे. याप्रकरणी पंतनगर/घाटकोपर पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा: Delhi Fire News: राजधानी दिल्लीत खळबळ! संसदेजवळील ‘नॉर्थ ब्लॉक’मागे भीषण आग; या प्रसंगाने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी आरती जाफर शेख आणि तिचा मुलगा आरव (वय नऊ महिने) हे घाटकोपर रेल्वे स्टेशन बाहेरील स्कायवॉकवर थांबले होते. त्याच वेळी तिचा पती जाफर शेख तिथे आला. त्याने आरतीसोबत कौटुंबिक कारणावरून जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेला आणि आरोपी जाफर याने आरतीला शिवीगाळ करत तीव्र रागाच्या भरात ९ महिन्यांच्या चिमुकल्या आरवला थेट जीवे मारण्याच्या उद्देशाने स्कायवॉकवरून खाली फेकून दिले.

हेही वाचा: Pune News: मैत्रीण धावली म्हणून वाचला जीव! पुण्यातील कात्रज-कोंढवा परिसरात १८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न…

बाळावर सायन रुग्णालयात उपचार; आरोपीला बेड्या

उंचावरून खाली फेकल्या गेल्यामुळे ९ महिन्यांचा आरव गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी बाळाला सुरुवातीला जवळच्या रुग्णालयात व त्यानंतर पुढील तातडीच्या उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली चिमुकल्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी बाप जाफर शेख याला तात्काळ ताब्यात घेतले व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही धक्कादायक घटना मुंबईत कुठे घडली?

    Ans: ही घटना घाटकोपर रेल्वे स्टेशन बाहेरील स्कायवॉकवर घडली.

  • Que: आरोपी बापाचे आणि पीडित बाळाचे नाव काय आहे?

    Ans: आरोपी बापाचे नाव जाफर शेख आहे, तर त्याच्या ९ महिन्यांच्या जखमी मुलाचे नाव आरव आहे.

  • Que: जखमी बाळावर कुठे उपचार सुरू आहेत?

    Ans: गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत

Web Title: Ghatkopar skywalk father throws 9 month old baby mumbai crime news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Crime case
  • Mumbai crime news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं! वसतिगृह परिसरात रक्तरंजित थरार; नेमकं काय घडलं?
1

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं! वसतिगृह परिसरात रक्तरंजित थरार; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू
2

अहिल्यानगर-जामखेड महामार्गावर भीषण अपघात! स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Husband Murder Case: विषाचा प्रयोग ठरला अपयशी! घाबरलेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने उरकली पतीची हत्या
3

Husband Murder Case: विषाचा प्रयोग ठरला अपयशी! घाबरलेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने उरकली पतीची हत्या

Mumbai News: धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट
4

Mumbai News: धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.