Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालखी सोहळ्यातही चोरट्यांचा सुळसुळाट; भाविकांचे मोबाइल लांबविले

पुणे-सोलापूर रस्त्यावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या दोन भाविकांचे मोबाईल चोरट्यांनी गर्दीतून पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 24, 2025 | 01:02 PM
पालखी सोहळ्यातही चोरट्यांचा सुळसुळाट; भाविकांचे मोबाइल लांबविले

पालखी सोहळ्यातही चोरट्यांचा सुळसुळाट; भाविकांचे मोबाइल लांबविले

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरट्यांनी आता थेट पालखी सोहळ्यातील भाविकांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या दोन भाविकांचे मोबाईल चोरट्यांनी गर्दीतून पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी (२२ जून) प्रस्थान झाले. पुणे-सोलापूर रोडवर रविवारी सकाळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. तेव्हा शिवम कमलेश पांडे (वय २६, रा. सुयोग अपार्टमेंट, औंध) हे भैरोबा नाला परिसरात सकाळी पावणेनऊच्या सुमारास दर्शनास आले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेताना चोरट्यांनी त्यांच्याकडील १० हजारांचा मोबाइल लांबविला. मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस हवालदार गाढवे तपास करत आहेत.

हडपसर गाडीतळ येथे दुसरी घटना घडली असून, सकाळी साडेनऊच्या सुमारास पालखीचे दर्शन घेताना नितीन साळुंखे (वय ४२, रा. घोटवडे, ता. मुळशी) यांच्या खिशातून ९ हजारांचा मोबाइल चोरट्यांनी लांबविला. याबाबत साळुंखे यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार गव्हाणे तपास करत आहेत.

पालखी सोहळ्यात दोन महिलांचे दागिने लांबविल्याच्याही घटना घडल्या आहेत. पालखी सोहळ्यातील चोरी रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. तरीही गर्दीत चोरट्यांनी भाविकांकडील मोबाइल, दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात घरफोडीच्या घटना सुरूच; ‘या’ भागातील फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज लांबविला

Web Title: There has been an incident of thieves stealing mobile phones during the palanquin ceremony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action
  • Theft Cases

संबंधित बातम्या

Cyber Crime : पैसाच पैसा! मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत 63.50 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
1

Cyber Crime : पैसाच पैसा! मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत 63.50 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
2

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

क्रिकेटविश्वाला हादरवणारी बातमी! Australia च्या David Warner ला पाकिस्तानात अटक; प्रकरण काय?
3

क्रिकेटविश्वाला हादरवणारी बातमी! Australia च्या David Warner ला पाकिस्तानात अटक; प्रकरण काय?

11 महिन्याच्या चिमुकल्याच्या खुनाचा ‘असा’ झाला उलगडा; शिरूर तालुक्यात खळबळ
4

11 महिन्याच्या चिमुकल्याच्या खुनाचा ‘असा’ झाला उलगडा; शिरूर तालुक्यात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.