Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

11 महिन्याच्या चिमुकल्याच्या खुनाचा ‘असा’ झाला उलगडा; शिरूर तालुक्यात खळबळ

गणपती भांबर्डे (ता.शिरुर) येथे जन्मदात्या आईनेच आपल्या ११ महिन्यांच्या मुलाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 07, 2026 | 05:09 PM
11 महिन्याच्या चिमुकल्याच्या खुनाचा 'असा' झाला उलगडा; शिरूर तालुक्यात खळबळ

11 महिन्याच्या चिमुकल्याच्या खुनाचा 'असा' झाला उलगडा; शिरूर तालुक्यात खळबळ

Follow Us
Follow Us:

रांजणगाव : गणपती भांबर्डे (ता.शिरुर) येथे जन्मदात्या आईनेच आपल्या ११ महिन्यांच्या मुलाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियामुळे या घटनेला वाचा फुटल्याचे शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.

 

याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश रविंद्र पवार (वय ११ महिने) असे मृत मुलाचे नाव असून, याप्रकरणी वडील रविंद्र अशोक पवार (रा. भांबर्डे, ता. शिरूर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत मुलाची आई पुजा रवींद्र पवार हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास भांबर्डे येथील शेतातील विहिरीजवळ ही घटना घडली आहे. सुरुवातीला हा प्रकार अकस्मात मृत्यू म्हणून नोंदविण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सखोल तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपी महिलेने मुलगा हा नेहमी किरकिर करून रडतो, कोठेतरी निघून जाऊन दुसरा चांगला नवरा पाहून लग्न करावे, मुलाला सोबत घेऊन गेल्यावर कोणी लग्न करणार नाही असा विचार करून तिने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेने मुलाचे डोके घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रक्त धुऊन काढून मृतदेह कपड्यांच्या बॅगमध्ये भरला. पुढे शेतातील विहिरीत बुडवण्यासाठी बॅगमध्ये दगड टाकून मृददेह पाण्यात फेकून दिल्याचेही निष्पन्न झाले आहे.

आरोपी महिलेने आपल्या तिसऱ्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर केल्याचे ५ एप्रिलला दिसलें असता रवींद्र पवार यांनी महिलेचा नुकताच विवाह झालेला पारनेर (जि. अहिल्यानगर) येथील तिसरा पती याला फोन करुन तुम्ही तुमचा संसार सुखाचा करा, परंतू माझे मुल मला परत आणून द्या, असे सांगितले असता पुजा हिने मुलं माझ्याकडे सुखरुप आहे, असे सांगून मुल देण्यास टाळाटाळ केली. रविंद्र यांना शंका आली. या मुलाचा लग्नाला अडसर होऊ नये म्हणून आईने खून केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान मयत मुलाची आई हिला सोमवारी, दिनांक ६ रोजी अटक करुन पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी आईने खुनाची कबुली दिली असल्याचे शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच वैद्यकीय अधिकारी व फॉरेन्सिक पथकानेही तपासात सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा : शाळेत झाली ओळख, यूट्यूबवरून शिकून सुरू केला ड्रग्जचा धंदा; दोन शिक्षकांना पोलिसांनी केली अटक

Web Title: Police have solved the murder of an 11 month old baby

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या
1

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या
2

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
3

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
4

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.