Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 08, 2026 | 03:43 PM
जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Follow Us
Follow Us:
  • जुन्नर तालुक्यात चिमुरडीवर अत्याचार
  • ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
  • पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हाप्रकरणी २ सप्टेंबर २०२६ रोजी हे दोषारोपपत्र सादर करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. आरोपी साहिल खैरे (वय २५) याच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी साडेनऊ वर्षांच्या मुलीला पेरू देण्याचे आमिष दाखवून ऊसाच्या शेतात नेण्यात आले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पोलिसांनी पीडितेच्या २५ वर्षीय ओळखीच्या गावातील आरोपीला अटक केली होती. या प्रकरणात खून, बलात्कार, बारा वर्षांखालील मुलीवरील बलात्कार आणि अपहरणासंबंधी भारतीय न्याय संहितेतील कलमांसह ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विशेष तपास पथकाचा वेगवान तपास

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी तपासावर देखरेख केली, तर आळेफाटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वास जाधव यांनी तपासी अधिकारी म्हणून पुरावे संकलित केले. घटनास्थळाचा पंचनामा, वैद्यकीय आणि न्यायवैद्यक अहवाल, साक्षीदारांचे जबाब तसेच अन्य तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांचा दोषारोपपत्रात समावेश करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

 नवीन साक्षीदार आले पुढे

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सांगितले की, तपासादरम्यान काही नवीन साक्षीदार पुढे आले असून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपी विरोधात वागणुकीबाबत गावपातळीवर यापूर्वी अनेक तक्रारी अथवा नाराजी असल्याची माहिती समोर आली; मात्र त्याबाबत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे या माहितीची स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात आली आहे.

घटनेनंतर अवघ्या पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असले, तरी खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची अद्याप नियुक्ती झालेली नाही. गंभीर गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हे सुद्धा वाचा : गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

Web Title: The police have filed a charge sheet in court against the accused in the pimpalvandi case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • junnar news

संबंधित बातम्या

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
1

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
2

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना
3

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
4

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.