Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Theft : चोरट्यांनी वाघोलीत फ्लॅट फोडला; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

वाघोली भागात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2025 | 02:56 PM
कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास

कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : वाघोली भागात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. चोरट्याने दरवाज्यावर ठेवलेली चावी घेऊन कुलूप उघडले आणि चोरी केली. चोरटा माहिती असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार वाघोलीतील काळूबाईनगर येथील ‘अश्विनी रेसीडन्सी’ सोसायटीत राहायला आहेत. त्या १७ जून रोजी दुपारी बंद करुन कामानिमित्त घरातून बाहेर पडल्या. त्यांनी फ्लॅटची चावी दरवाज्याजवळ ठेवली होती. चावी ठेवलेल्या जागेची माहिती महिलेच्या कुटुंबीयाना असते. त्यामुळे महिला नेहमी दरवाज्याजवळ असलेल्या जागेत चावी ठेवायची. चोरट्याने दरवाज्याजवळ ठेवलेली चावी घेऊन फ्लॅटचे कुलूप उघडले. बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटा पसार झाला.

महिला सायंकाळी घरी आली. तेव्हा ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. अधिक तपास उपनिरीक्षक बागल करत आहेत. अनेकजण फ्लॅटची चावी दरवाज्याजवळील कुंडीत, सापटीत, तसेच पादत्राणे ठेवण्याच्या रॅकमध्ये ठेवतात. चावीची जागी कुटुंबीयांना माहित असते. तीच संधी चोरटे साधतात आणि घरसाफ करत असल्याचे दिसत आहे.

कोंढव्यात घरफोडी

कोंढव्यात फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला कोंढवा परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या १६ जून रोजी सायंकाळी बाहेर पडल्या होत्या. तेव्हा चोरट्यांनी कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून २ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. सहायक निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

मंदिरातील दानपेटी फोडली

चंदननगरमधील मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी १६ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुखदेव विट्ठल साकोरे (वय ६३, रा. शिवशक्ती चौक, गणेशनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. वडगाव शेरीतील जुन्या मुंढवा रस्त्यावर संत श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आहे. चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. मंदिरातील दानपेटीचे कुलूप उचकटून १६ हजारांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करत आहेत.

Web Title: Thieves break into flat in wagholi steal lakhs of rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • House Theft
  • Pune Police
  • Pune Theft

संबंधित बातम्या

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
1

Pune Crime : कात्रज-नवले ब्रिजवर रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला; आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

Palghar Accident News: पालघर अपघातात १३ जणांचा मृत्यू; वारसांना ५ लाखांची शासकीय मदत घोषित
2

Palghar Accident News: पालघर अपघातात १३ जणांचा मृत्यू; वारसांना ५ लाखांची शासकीय मदत घोषित

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या
3

Navi Mumbai : भाडे घेण्याच्या वादातून रिक्षा चालकांमध्ये तुफान हाणामारी; झटापटीत 18 वर्षीय युवकाची हत्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
4

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.