चतु:शृंगी, वाघोली आणि कोंढव्यात प्रत्येकी एका ठिकाणी घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करून चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने, लॅपटॉप व मोबाइल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
पिंपरीतील व्यावसायिकावर भरदिवसा गोळीबार करून सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणातील सराईत गुन्हेगार रवींद्र भाऊसाहेब घारे याला मालमत्ता विरोधी पथकाने अखेर गजाआड केले आहे.
खराडी आणि हडपसर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील व पर्समधील दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या असून, दोन घटनांमध्ये एकूण सव्वाचार लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत.
राज्यात चोरीच्या घटना वाढल्या असून, पुण्यातील महंम्मदवाडी परिसरातील बंद वॉईन शॉपी फोडून चोरट्यांनी रोकडसह विदेशी दारूंच्या बाटल्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
तूप विक्रीसाठी आल्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून देवघरातील देवीच्या अंगावरील दागिने चोरून पळ काढणाऱ्या दोन महिलांना ग्रामस्थांनी सतर्कतेने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
वडगाव बुद्रुक परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे.
वाघोली भागात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून ७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा…
प्रवासी घेऊन निघालेली एसटी बस बंद पडल्यानंतर चालक अन् वाहकाने प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढे पाठवले व स्वत: बसमध्ये झोपले. मात्र, चोरट्यांनी या बंद पडलेल्या बसमधील डिझेल चोरी करून नेल्याचा प्रकार…
वडगाव शेरी परिसरात सराफी दुकानात खरेदीच्या निमित्ताने आलेल्या दोन महिलांनी कामगारांची नजर चुकवून तेथील ६० हजार रुपयांची सोन्याची अंगठी घेऊन पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
गुरुदास याच्याकडे काही उधारी झालेली असल्याने विनोद यांनी त्याला पैसे मागितले असता त्याने माझी पत्नी व मुले गावाला आहेत. त्यांना घेऊन येथून मित्राकडून पैसे आणायचे असे सांगून गुरुदासने विनोद यांना…
कारचालकांकडे बतावणी करुन चोरट्यांनी सोन्याचे दागिने, लॅपटॉपप आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.