Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यात चोट्यांचा उच्छाद, भोरमधील ‘स्वप्नलोक सोसायटी’तील 5 बंद घरे फोडली; तब्बल…

भोर शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नामांकित स्वप्नलोकनगरी सोसायटीमधील तब्बल पाच बंद फ्लॅट्सचे कुलूपे व सेफ्टी दरवाजे तोडून चोरट्यांनी शुक्रवार (दि.१) रोजी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घातला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 03, 2026 | 06:12 PM
पुणे जिल्ह्यात चोट्यांचा उच्छाद, भोरमधील 'स्वप्नलोक सोसायटी'तील 5 बंद घरे फोडली; तब्बल...

पुणे जिल्ह्यात चोट्यांचा उच्छाद, भोरमधील 'स्वप्नलोक सोसायटी'तील 5 बंद घरे फोडली; तब्बल...

Follow Us
Follow Us:

भोर : भोर शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नामांकित स्वप्नलोकनगरी सोसायटीमधील तब्बल पाच बंद फ्लॅट्सचे कुलूपे व सेफ्टी दरवाजे तोडून चोरट्यांनी शुक्रवार (दि.१) रोजी रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घातला. या धाडसी चोरीत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे. याप्रकरणी अविराज अशोक मालुसरे (मूळ गाव – लव्हेरी, सध्या रा. स्वप्नलोकनगरी, भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नलोक नगरीतील वेगवेगळ्या इमारतींमधील पाच बंद फ्लॅट्सना चोरट्यांनी रात्रीच्या वेळी टार्गेट केले. चोरट्यांनी घरांचे मुख्य दरवाजे आणि लोखंडी सेफ्टी दरवाजांचे कोयंडे व कुलूपे कटर किंवा अवजारांच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला. या चोरीमध्ये गणेश सुदाम खोपडे, लोकेश दशरथ भगत, अभिजित शामराव फरगडे,श्रीमंत सुभाष बोडके आणि अविराज अशोक मालुसरे यांच्या राहत्या घरांना लक्ष्य करण्यात आले. यापैकी तीन घरांमध्ये चोरट्यांना सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हाती लागली, तर दोन घरांमध्ये काहीच न मिळाल्यामुळे चोरट्यांनी केवळ तोडफोड करून संतापजनक प्रकार केला.

विशेष म्हणजे, या सोसायटी मधील घरांच्या मुख्य दरवाजांना सुरक्षेच्या दृष्टीने बळकट लोखंडी सेफ्टी दरवाजे बसवलेले असतानाही, ते तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. सणासुदीच्या व पावसाळ्याच्या दिवसांत रात्रीच्या वेळी घडलेल्या या मोठ्या चोरीमुळे भोर शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिला खोत आणि पोलीस हवालदार धर्मराज खांडे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला

बसप्रवासात आणि बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांवर हात साफ करण्याच्या घटना कात्रज आणि स्वारगेट परिसरात घडल्या. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या, दागिने आणि रोकड असा सुमारे एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Thieves have broken into residents homes in bhor and committed theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Bhor Crime
  • House Theft
  • Theft Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.