Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल…

बसप्रवासात आणि बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांवर हात साफ करण्याच्या घटना कात्रज आणि स्वारगेट परिसरात घडल्या. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2026 | 03:21 PM
पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल...

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल...

Follow Us
Follow Us:

पुणे : बसप्रवासात आणि बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांवर हात साफ करण्याच्या घटना कात्रज आणि स्वारगेट परिसरात घडल्या. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या, दागिने आणि रोकड असा सुमारे एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बसप्रवासात दोन सोन्याच्या बांगड्या लंपास

कात्रज परिसरात बसमधून प्रवास करणाऱ्या ६० वर्षीय महिलेच्या हातातील ५० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या चोरट्याने लंपास केल्या. याबाबत  भोसरी-आळंदी रस्ता  भागात राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेने  भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला १७ मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास मोरेबाग बसथांबा, कात्रज परिसरातून त्या बसने प्रवास करीत होत्या. बसमध्ये गर्दी होती. याचा फायदा घेत चोरट्याने दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या.

बसथांब्यावर पर्स चोरून दागिने, रोकड लंपास

कात्रज चौकातील पीएमपीएमएल बसथांब्यावर महिलेच्या बॅगमधील पर्स चोरून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ६० हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. त्रिमूर्ती चौक  कात्रज भागात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ३० जुलै रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील बसथांब्यावर ही घटना घडली. चोरट्याने महिलेच्या बॅगेतील पांढऱ्या रंगाची पर्स चोरली. त्यात सोन्याचे घंटन, चांदीच्या कानातील रिंगा आणि रोकड होती.

हे सुद्धा वाचा : अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी CJP ची कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक; धर्मेंद्र प्रधानांनंतर आता लागणार गडकरींचा नंबर?

बसध्ये चढताना ज्येष्ठ महिलेची बांगडी लंपास

स्वारगेट येथे बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत ७२ वर्षीय महिलेच्या हातातील १२ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केली. याबाबत ७२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला ३० जुलै रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्या स्वारगेटहून भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली.

Web Title: Thieves have stolen jewelry from women on a bus in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
2

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
3

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.