Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: दौंडमध्ये मोबाईल विक्रीचे दुकान फोडून ५७ हजाराचा ऐवज लंपास

अंगावर जीन्स, टी शर्ट व पाठीवर सॅक असलेल्या या तीन युवकांचा पोलिस शोध घेत आहेत. भर बाजारपेठेतील दुकाने फोडून चोरी झाल्याने व्यापारी वर्ग आणि नागरिक धास्तावले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 22, 2025 | 02:35 AM
Crime News: दौंडमध्ये मोबाईल विक्रीचे दुकान फोडून ५७ हजाराचा ऐवज लंपास
Follow Us
Close
Follow Us:

दौंड: दौंड शहराच्या बाजारपेठेतील एक मोबाइल विक्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील ५७ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला . तर भरचौकातील अन्य एका गॅस एजन्सी दुकानाचे शटरच्या कुलूप लावण्याच्या दोन कड्या अवघ्या १६० सेकंदात तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता.

याबाबात अधिक माहिती अशी की , दौंड शहरातील दौंड – सिध्दटेक अष्टविनायक मार्गावर भंगाळे हॉस्पिटल समोरील श्री गणेश मोबाइल शॉपी येथे काल दि. २० रोजी मध्यरात्री चोरी झाली.चोरट्यांनी शटर उचकटून दुकानातील दोन नवीन व दोन जुने मोबाइल हॅण्डसेट व रोख ३४ हजार रूपये, असा एकूण ५७ हजार १०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत दुकानाचे मालक नितीन सलामपुरे यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ओझा गॅस एजन्सी या दुकानाच्या शटरचे कुलूप लावण्याच्या दोन कड्या तोडून आत प्रवेश केला. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अवघ्या दोन मिनिट व चाळीस सेकंदांमध्ये चोरट्यांनी दोन कड्या तोडून आत प्रवेश केला.  चोरट्यांनी मोबाइल हॅण्डसेट मधील बॅटरीच्या उजेडात आतील भागात जाऊन पाहणी केल्याच्या नोंदी आहेत. या बाबत गॅस एजन्सीचे वितरक गोविंद ओझा यांनी सांगितले की, चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला परंतु यामध्ये दुकानातील काही चोरीस गेले नाही.
शहारातील मुख्य चौकातील ओझा गॅस एजन्सीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अंदाजे २० ते २५ वयोगटातील तीन युवक शटर तोडताना दिसत आहेत. अंगावर जीन्स, टी शर्ट व पाठीवर सॅक असलेल्या या तीन युवकांचा पोलिस शोध घेत आहेत. भर बाजारपेठेतील दुकाने फोडून चोरी झाल्याने व्यापारी वर्ग आणि नागरिक धस्तावले आहेत.
दौंड पोलीस स्थानकापासुन साधारणतः ५०० ते ७०० मीटरवर चोरीच्या घटना घडल्या आहेत. यावेळी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास ओझा यांनी पोलिस स्थानकात फोन केला व शटर उचकले आहे; मात्र चोरीस काहीच गेले नाही ,असे सांगितलेले असताना ठाणे अंमलदार यांनी चोरीस काही गेले नाही तर सकाळी पोलीस येतील ,असे सांगत फोन ठेवला .त्यानंतर सकाळी पोलीस पोहोचले नाहीत तर पुन्हा ओझा यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क केल्यानंतर पोलीस बारा वाजता पोहोचले. पोलीस स्थानकाच्या शेजारीच असलेल्या ठिकाणी पोलिसांना चोरीच्या गुन्ह्यात भेट देता येत नसे,ल तर संपुर्ण कार्यक्षेत्रात हे कधी भेटणार आणि पोलिसिंग कसे होणार? असा सवाल निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक्षक काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Thieves looted 57 thousand rs mobile handset on brake the mobile shop daund crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Daund Crime
  • Daund News

संबंधित बातम्या

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले
1

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! ‘इन्स्टाग्राम रील्स’साठी नियम मोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
2

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! ‘इन्स्टाग्राम रील्स’साठी नियम मोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त
3

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे ‘भोंदूबाबा’ कनेक्शन उघड! पतसंस्थेतील खात्यातून ४० ते ५० कोटींचे संशयास्पद व्यवहार
4

Ashok Kharat Case: रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे ‘भोंदूबाबा’ कनेक्शन उघड! पतसंस्थेतील खात्यातून ४० ते ५० कोटींचे संशयास्पद व्यवहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.