Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरदुपारी सहकारनगरमध्ये धाडसी चोरी; महिलेकडील एक लाखाची रोकड पळवली

सहकारनगर भागात भरदुपारी दुचाकीचालक महिलेजवळील १ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 07, 2025 | 12:04 PM
भरदुपारी सहकारनगरमध्ये धाडसी चोरी; महिलेकडील एक लाखाची रोकड पळवली

भरदुपारी सहकारनगरमध्ये धाडसी चोरी; महिलेकडील एक लाखाची रोकड पळवली

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सहकारनगर भागात भरदुपारी दुचाकीचालक महिलेजवळील १ लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांवर गु्न्हा नोंद केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला तळजाई वसाहत भागात राहायला आहेत. त्या बुधवारी (५ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास सहकारनगर भागातून दुचाकीवरुन मुलासोबत निघाल्या होत्या. महिलेने बँकेतून एक लाखांची रोकड काढून पिशवीत ठेवली होती. विद्या विकास शाळेजवळ पाठिमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या हातातील रोकड असलेली पिशवी हिसकावून पोबारा केला. पिशवी हिसकावताच महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गौड यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले आहे. सहायक निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

शहरात महिलांकडील दागिने हिसकावणे, तसेच पादचाऱ्यांकडील मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारचे १८० हून जास्त गु्न्हे दाखल झाले होते.

महिलेकडील अडीच लाखांचे दागिने चोरी

पादचारी महिलेकडील अडीच लाखांचे सोन्याचे दागिन चोरून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली आहे. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कात्रज-कोंढवा रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या मंगळवारी वाघोली भागात गेल्या होत्या. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास त्या ढोले पाटील महाविद्यालयाजवळ थांबल्या होत्या. दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरुन नेले. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.

Web Title: Thieves steal rs 1 lakh cash from woman in punes sahakarnagar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.