Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट, लातुरातील तिसरा डॉक्टर सीबीआयच्या रडारवर; कसून तपास सुरु

देशातील २३ लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेला लातूरचा बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरुरे आता माफीचा साक्षीदार झाला असून, तपासाच्या दृष्टीने हा एक मोठा दुवा मानला जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2026 | 03:52 PM
CBI Special Court Delhi NEET Scam

CBI Special Court Delhi NEET Scam

Follow Us
Follow Us:

लातूर : देशातील २३ लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेला लातूरचा बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरुरे आता माफीचा साक्षीदार झाला असून, तपासाच्या दृष्टीने हा एक मोठा दुवा मानला जात आहे. परंतु डॉ. शिरुरे पेपरफुटी प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे, त्याचे नाव सांगू शकेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, डॉ. शिरुरे याने प्रा. प्रल्हाद (पी.व्ही.) कुलकर्णी ला क्लासेस घेण्यासाठी घर व हॉस्पिटलची जागा उपलब्ध करून दिली, असा संशय असून या माध्यमातून सीबीआयच्या हाती बरेच पुरावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

पी.व्ही. कुलकर्णी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन क्लासेस घेत असे आणि त्याच्याबरोबर डॉ. शिरूरे याचे झालेले फोन कॉल्स संशयास्पद असल्याचा सीबीआयचा होरा आहे. या कॉल्सच्या माध्यमातून सीबीआयच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागण्याची शक्यता आहे. असे समजते की, प्रा.पी. व्ही. कुलकर्णी हा डॉ. शिरुरे याचा गुरु असून, आता माफीचा साक्षीदार झाल्यानंतर हा शिष्य आपल्या गुरुबद्दल काय सांगतो, याबद्दल साहजिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई

डॉ. शिरूरेचा मेव्हणा प्रवीण कुलकर्णी याच्या घरी एकाने परीक्षा दिली आणि पी. व्ही. कुलकर्णीने तो पेपर दिला असावा, असा सीबीआयला संशय आहे. सीबीआय त्या दिशेने तपास करीत आहे. दरम्यान, लातूर शहरातील औसा रोडवर असलेल्या देशमुख हॉस्पिटलकडे सीबीआयने आपला मोर्चा वळविला असून, सीबीआयच्या रडारवर लातूरमधील हा तिसरा डॉक्टर आला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी देशमुख यांनी नीट पेपर विकत घेतला असावा असा सीबीआयला संशय आहे. त्या दृष्टीने सीबीआय धागेदोरे जुळविण्याच्या कामात आहे. पेपर विकत घेतलेले सगळेच पालक सीबीआयच्या रडारवर आले आहेत, हे विशेष.

आणखी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सीबीआय करीत असून, काल अंबाजोगाई येथे दोन विद्यार्थ्यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. विद्यार्थ्यांना क्रॉस चेक करण्यासाठी समोरासमोर चौकशीही सुरू आहे. एकाच कुटुंबातील अनेक जण पेपरफुटीचे लाभार्थी असल्याचाही सीबीआयचा दाट संशय आहे. अंबाजोगाई येथे ताब्यात घेतलेले दोन्ही विद्यार्थी एकाच घरातले असून, त्यापैकी एक बहीण रिपीटर आहे तर भाऊ फ्रेशर आहे, असे समजते.

हे सुद्धा वाचा : NEET पेपरफुटी प्रकरणावरुन मावळ काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वामी यांचीही सीबीआयने केली चौकशी

नांदेड येथे विकास पाटील याच्या घरी सुद्धा एक व्यक्ती पेपर देत असल्याचे आढळल्याचे कळते. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींना पुण्यात एकत्र आणून त्यांची झाडाझडती समोरासमोर घेतली जात असून, यापूर्वीच्या २०२४ च्या पेपरफुटीतही शिवराज मोटेगावकरचा सहभाग होता काय, याचाही सीबीआय कसून तपास करीत आहे. या प्रकरणी लातूर येथील डॉ. स्वामी यांची चौकशी केली.

Web Title: Third doctor from latur has come on cbis radar in neet paper leak case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • crime news
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद
1

Odisha Crime : बायको मिळवण्यासाठी नरबळी! जेवणाच्या बहाण्याने मित्राला बोलावलं अन् झोपेतच केला शिरच्छेद

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
2

‘सॉरी मम्मी-पापा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर नक्की बनेन’; नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
3

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला
4

आम्ही इथले डॉन आहोत, तुला येथे राहायचे असेल तर…; संभाजीनगरात परप्रांतीय कामगारावर हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.