crime (फोटो सौजन्य- pinterest)
एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आधी फोटो दाखवून धमकी दिली नंतर कॉलेजच्या गोडाऊनमध्ये घेऊन जात विनयभंग केला. विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हि घटना अहिल्यानगर येथे घडली.
छोटा राजन टोळीच्या दोघांची जन्मठेप कायम जेजे सिग्लनजवळचे हत्याकांड
अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील (Government Technical College) येथे घडली आहे. काही विद्यार्थिनींचे वर्गमित्रासोबत बसलेले फोटो विभागप्रमुखांना दाखवून शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी दिली. नंतर कॉलेजच्या गोडाऊनमध्ये घेऊन जात विनय भंग केला. आरोपी हा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम करतो. आरोपीचा नाव अमित खराडे आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या अमित खराडे याने कॉलेजमधील काही विद्यार्थिनींचे वर्गमित्रासोबत बसलेले फोटो विभाग प्रमुखांना दाखवून शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी दिली. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. कॉलेजच्या गोडाऊनमध्ये घेऊन जात संबंधित विद्यार्थिनीला लज्जा उत्पन्न होईल अस वर्तन आरोपीने केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे या आरोपीने दोन विद्यार्थिनींसोबत हा प्रकार केल्याचे समोर आले असून अल्पवयीन विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी ताब्यात
आरोपी अमित खराडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित दोन विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी आपल्या मैत्रिणीला हा प्रकार सांगितला आणि या विद्यार्थिनीने धाडस करत 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना सर्व हकीकत सांगितल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वी नाशिकमध्ये दगडफेक; २२ पोलीस जखमी
नाशिकच्या काठे गल्लीतील अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीच काल (१५ एप्रिल) रात्री उशिरा या भागात जोरदार राडा झाला. दर्गा हटवण्याच्या कारवाईपूर्वीच दर्ग्याच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पण अचानक त्या ठिकाणी मोठा जमाव आक्रमक झाला आणि पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत २२ पोलिस जखमी झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. पण पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या पोलिस बंदोबस्तात पहाटेपासून दर्गा हटवण्याचे काम सुरू आहे. काठे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.