पुण्यातील येरवडा भागात एका सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्याच्या वडगाव परिसरात अशीच एक घटना घडली आहे. वडगाव परिसरात लघुशंका करणाऱ्या तरूणाला हटकल्याने पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटणा घडली आहे. या घटनेत तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, एक जोडपे एक कट्ट्यावर बसले होते. त्याचवेळी दुचाकीवरून तीन जण आले आहे. त्यातील एक त्या ठिकाणी लघुशंका करू लागला. दरम्यान असे करत असताना त्या जोडप्याने लघुशंका करणाऱ्या तरुणाला हटकले. याकहा राग आल्याने त्या तरुणांनी महिलेच्या डओयत कोयत्याने वार केले. तसेच पतीवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना घडल्यानंतर या महिलेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी तिघांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान येरवडा भागात सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नागपुरात देखील अशीच घटना
पुण्यातील शास्त्रीनगर चौकातील सिग्नल परिसरात एका तरुणाचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता नागपुरातही असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वर्धा मार्गावर कारागृहाजवळील सुशोभीकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींकडे पाहत एका तरुणाने अश्लील वर्तन केले. हा प्रकार समोर येताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली.
पुण्यातील ‘त्या’ प्रकरणानंतर नागपुरातही तसाच प्रकार; 28 वर्षीय तरूणाने तरुणींकडे पाहत…
शांत कुमार (वय 28) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून, गेल्या सहा महिन्यांपासून नागपुरातील ली मेरेडियन हॉटेलमध्ये किचन सुपरवायझर म्हणून काम करतो. वर्धा मार्गावर कारागृहाजवळील सुशोभीकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींकडे पाहत त्याने अश्लील वर्तन केले. हा युवक निर्लज्जपणे आपल्या कृत्यात मग्न होता. दरम्यान, एका तरुणीने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. आपले चाळे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे लक्षात येताच आरोपी कारमध्ये बसून पळून गेला. पण त्याचा गाडी क्रमांक व्हिडीओत स्पष्ट दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
तरुणींनी विरोध केला पण…
आरोपी शांत कुमार हा कारने परिसरात दाखल झाला. तो फोनवर बोलत तरुणींसमोरून फिरू लागला. फिरता-फिरता अचानक तो अश्लील कृत्य करू लागला. तरुणींनी त्याला विरोध केला, पण तो थांबण्यास तयार नव्हता. त्यामुळे एका धाडसी तरुणीने त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तिच्या मैत्रिणीला तातडीने पोलिसांना संपर्क करण्यास सांगितले. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीला बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.