वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नागपूर : पुण्यातील शास्त्रीनगर चौकातील सिग्नल परिसरात एका तरुणाचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता नागपुरातही असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वर्धा मार्गावर कारागृहाजवळील सुशोभीकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींकडे पाहत एका तरुणाने अश्लील वर्तन केले. हा प्रकार समोर येताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली.
शांत कुमार (वय 28) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून, गेल्या सहा महिन्यांपासून नागपुरातील ली मेरेडियन हॉटेलमध्ये किचन सुपरवायझर म्हणून काम करतो. वर्धा मार्गावर कारागृहाजवळील सुशोभीकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींकडे पाहत त्याने अश्लील वर्तन केले. हा युवक निर्लज्जपणे आपल्या कृत्यात मग्न होता.
दरम्यान, एका तरुणीने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. आपले चाळे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे लक्षात येताच आरोपी कारमध्ये बसून पळून गेला. पण त्याचा गाडी क्रमांक व्हिडीओत स्पष्ट दिसत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
पोलिस अधिकाऱ्यांकडून कारवाईचे आदेश
झोन 2 चे डीसीपी राहुल मदने यांनी तातडीने धंतोली पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शोधमोहीम राबवून शांत कुमारला अटक केली.
तरुणींनी विरोध केला पण…
आरोपी शांत कुमार हा कारने परिसरात दाखल झाला. तो फोनवर बोलत तरुणींसमोरून फिरू लागला. फिरता-फिरता अचानक तो अश्लील कृत्य करू लागला. तरुणींनी त्याला विरोध केला, पण तो थांबण्यास तयार नव्हता. त्यामुळे एका धाडसी तरुणीने त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तिच्या मैत्रिणीला तातडीने पोलिसांना संपर्क करण्यास सांगितले. ही घटना बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीला बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पुण्यात गौरव आहुजाचा व्हिडिओ व्हायरल
गौरव आहुजा नामक तरुणाचा हा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. पुणे पोलीस देखील गौरव आहुजाचा तपास करण्यात गुंतले होते. पण आता गौरव आहुजाचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तो त्याने केलेल्या अश्लील कृत्याबद्दल माफी मागत असल्याचे दिसत आहे.