Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: मोठी कारवाई! संभाजीनगरमध्ये ६१ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक; तर ‘इतक्या’ लाखाचा ऐवज जप्त

Chhatrapati Sambhajinagar: पथकाने आरोपींकडून ६१ ग्रॅम एमडी (MD) या अमली पदार्थासह एक कार असा सुमारे १४ लाख ६० हजार ७०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 24, 2025 | 03:05 PM
संभाजीनगरमध्ये ६१ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक (Photo Credit - X)

संभाजीनगरमध्ये ६१ ग्रॅम एमडीसह तिघांना अटक (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • अमलीपदार्थाची तस्करी करणारे जेरबंद
  • ६१ ग्रॅम एमडीसह १४ लाख ६० हजारांचा ऐवज हस्तगत
  • पोलिसांची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (Anti-Narcotics Department) पाठलाग करून आवळल्या आहेत. पथकाने आरोपींकडून ६१ ग्रॅम एमडी (MD) या अमली पदार्थासह एक कार असा सुमारे १४ लाख ६० हजार ७०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ही धडक कारवाई २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास छावणी हद्दीत करण्यात आली.

अटक आरोपींची नावे आणि गुन्हा दाखल

या प्रकरणी आबुज अमर चाऊस (३०, रा. सहेदा कॉलनी), मोहम्मद इसान मोहम्मद यासीन (३५, रा. कटकट गेट) आणि समीर चाँद खान उर्फ पप्पु (३४, रा. रहेमानिया कॉलनी) या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पडेगावपासून पाठलाग, छावणीत मुसक्या आवळल्या

एका कारमधून (एमएच ०५ एएक्स-३०३६) एमडी या अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे म्हस्के यांनी पथकासह पडेगाव परिसरात सापळा रचला.

हे देखील वाचा: सायबर चोरट्यांना बँक खाते वापरण्यास देणाऱ्याला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

तस्करांना कारवाईची कुणकुण लागताच त्यांनी कार भरधाव वेगाने पळवली. मात्र, म्हस्के आणि त्यांच्या पथकाने पडेगावपासून कारचा पाठलाग करून आरोपींना छावणी परिसरात गाठले. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना पकडून कारची झडती घेतली असता, कारमध्ये ६१ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ आढळून आला.

मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार, एमडी मालेगावहून आणले

गुन्ह्यातील मुख्य आरोपी आबुज अमर चाऊस हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, तो अनेक दिवसांपासून अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. चौकशीदरम्यान, आबुज याने जप्त केलेले एमडी धुळे आणि मालेगाव येथून आणल्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यात जप्त केलेली कार आबुजने एका डीलरकडून खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी छावणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

कारवाई करणारे पथक

पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक आयुक्त वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रविकांत गच्चे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, हवालदार लाला पठाण, नितेश सुंदडें, जाधव, निभूवन, काळे आदींनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

हे देखील वाचा: Washim Crime: ट्युशन क्लासमध्ये अल्पवयीन मुलावर शिक्षकाने केले अश्लील चाळे, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Web Title: Three arrested with 61 grams of md in sambhajinagar so much worth of contraband seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Drugs
  • Drugs Case

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह!
1

छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! कोट्यवधींच्या गुन्ह्यांनंतर राज्याच्या सायबर सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह!

Orry Video:ड्रग्ज प्रकरणाच्या वादात Urvashi Rautelaचा व्हिडिओ व्हायरल; सेलिब्रिटींच्या कमेंट्सची चर्चा
2

Orry Video:ड्रग्ज प्रकरणाच्या वादात Urvashi Rautelaचा व्हिडिओ व्हायरल; सेलिब्रिटींच्या कमेंट्सची चर्चा

Chhatrapati Sambhajinagar Crime: अंगणात पाणी सांडल्यावरून तुफान हाणामारी; ८ जणांनी तरुणाला बेदम मारहाण करत डोके फोडले
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: अंगणात पाणी सांडल्यावरून तुफान हाणामारी; ८ जणांनी तरुणाला बेदम मारहाण करत डोके फोडले

एका अपघातामुळे पेटला आशेचा दिवा! ६ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची चित्रपटासारखी कथा
4

एका अपघातामुळे पेटला आशेचा दिवा! ६ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची चित्रपटासारखी कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.