संग्रहित फोटो
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दौंड शहरातील सनी नितीन वाणी यांच्या पत्नी अर्पीता सनी वाणी (वय २४ ) आणि पाच वर्षाचा मुलगा ऐरीक सनी वाणी (दोन्ही रा. यादववस्ती क्रिडासंकुल जवळ दौंड) हे मावशीच्या राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता बेपत्ता झाले आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण येथील पांडुरंग जर्नादन दळवी यांची पत्नी पुष्पा पांडुरंग दळवी (वय ३५) या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पांडुरंग दळवी यांनी दौंड पोलिस ठाण्यात दिली आहे.
तर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून बसेसने प्रवास करणारे प्रवासी जयशंकर वसंत व्यवहारे (वय २७ रा. ढेकळेवाडी (वैरागवाडी), ता. मोहोळ जि. सोलापुर) यांची पत्नी वैष्णवी जयशंकर व्यहारे (वय २०) या खडकी येथील हॉटेल पंचरत्न येथुन बेपत्ता झाल्या आहेत. हे दोघे नवरा बायको पुणे ते सोलापूर महामार्गावरून एसटी बसेस ने गावाला जात असताना बस ही खडकी येथील हॉटेल पंचरत्न आहे, तेथे नाष्टा करण्यासाठी थांबली होती. यावेळी जय शंकर यांची पत्नी वैष्णवी ही तेथुन अचानक बेपत्ता झाली. या तिन्ही बेपत्ता विवाहित महिलांची मिसिंगची तक्रार दौंड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी त्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकडून केली जात आहे.
हे सुद्धा वाचा : घरगुती गॅसची चिंता नाही, पुढील 25 दिवसांत…; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा






