crime (फोटो सौजन्य : social media)
नाशिक मधून एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बिडी कामगार परिसरातील बांधकाम साईटवर तयार केलेल्या एका कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. कालपासून बेपत्ता असलेल्या मुलांचे मृतदेह अग्निशमन दलाने तलावातून बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, काल (रविवार) दुपारपासून ही मुलं बेपत्ता झाली होती. त्यांनतर त्या मुलांचा शोध सुरु होता. कृत्रिम तलावाच्या काठावर मुलांचे कपडे आढळून आल्याने शोधकाऱ्याला गती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ शोधमोहीम सुरु केली आणि अथक प्रयत्नानंतर तिन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहे. आडगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मुलांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
वाढदिवसाच्या पार्टीत टिश्यू पेपरवरून वाद आणि दारूची बाटली थेट डोक्यात
लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका धाब्यावर वाढदिवस साजरा करतांना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरु झालेला वाद थेट दारूच्या बॉटलने तोंड ठेचण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आला आहे. हा प्रकार एका अल्पवयीन मुलाने केला असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या गोंधळात अनेक अल्पवयीन तरुणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लातूर शहरातील रिंगरोडवरील ढाब्यावर रात्रीच्या वेळी मद्यपींची मोठी गर्दी असते. यावेळी दीपक सूर्यवंशी ( रा. कोंडदेव नगर लातूर) आणि संगमेश्वर काळगे ( रा. खणी लातूर) हे दोघे त्याच्या मित्रांबरोबर दारू पीत आणि जेवण करत बसली होते. त्यांच्या समोरच्या टेबलवर आणखीन काही तरुण बसले होते. वाढदिवसाची पार्टी सुरू होती. वेटरला टिशू पेपर मागण्यात आला.. वेटरला वेळोवेळी जोरात आवाज देण्यात येत होता. आजू बाजूला बसलेल्या या दोन टेबलवरील तरुणांमध्ये मोठ-मोठ्याने बोलण्यावरून वाद निर्माण झाला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट रस्त्यावर आला. आणि डोक्यात दारूची बाटली घातली. यामध्ये दीपक आणि संगमेश्वर हे दोघे जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आलं.