Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर- गंगापूर रोडवरील बाबरगाव फाट्याजवळ शनिवारी (दि. १३ जून) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ट्रक व स्कुटीचा भीषण अपघात होऊन ट्रक चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 14, 2026 | 12:38 PM
भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना

भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडले, तिघांचा मृत्यू; संभाजीनगर- गंगापूर रोडवरील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर- गंगापूर रोडवरील बाबरगाव फाट्याजवळ शनिवारी (दि. १३ जून) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ट्रक व स्कुटीचा भीषण अपघात होऊन ट्रक चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महादेव चंद्रकांत घुले (वय ३०, रा. जालना), मीरा कडूबा पांडव (वय २५, रा. गुंडेवाडी, ता. अंबड), राजकुमार देवेंद्र आप्पा (वय ४६, रा. मंगलगी, कर्नाटक) अशी मयतांची नावे आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (क्र. केए ५६ ८७६८) गंगापूरकडून कर्नाटकच्या दिशेने जात होता. त्याचवेळी जालना येथून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेल्या युवक व युवती स्कुटी (क्र. एमएच-२०-एचयू-४४०७) वरून प्रवास करत होते. दरम्यान, अपघात टाळण्याच्या प्रयत्नात चालकाने ट्रक रस्त्याच्याखाली घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी स्कुटी ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडली गेली तर ट्रक रस्त्याच्या खाली पलटी होऊन भीषण दुर्घटना घडली. या अपघातात महादेव याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मीरा ही तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर ट्रक पलटी झाल्याने चालक ट्रकमध्ये अडकला होता. स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. मृत चालकाचे नाव राजकुमार देवेंद्र आप्पा (वय ४६, रा. मंगलगी, जि. कर्नाटक) असे आहे.

हे सुद्धा वाचा : धाराशिवमध्ये खळबळ! तरुणीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह; मोटारसायकलवर बसवून नेले अन्…

या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व सागर शेजूळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत वाहतूक झाली होती. गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : अन्न भासळविरोधी कारवाईची धास्ती, पनीरसह भेसळीचे दुग्धजन्य पदार्थ गायब; खुले खाद्यतेलही बाजारातून गायब

Web Title: Three people have died in a horrific accident on the sambhajinagar gangapur road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • crime news

संबंधित बातम्या

मरण स्वस्त होतेय? वाहनचालकांचा बेशिस्तपणा; पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू
1

मरण स्वस्त होतेय? वाहनचालकांचा बेशिस्तपणा; पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

Baramati News: बारामती पोलिसांचा धडाका! ११ लाखांच्या बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटचा साठा जप्त; मुंबई कनेक्शन उघड
2

Baramati News: बारामती पोलिसांचा धडाका! ११ लाखांच्या बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटचा साठा जप्त; मुंबई कनेक्शन उघड

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई
3

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime : अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

Pune Crime : अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.