Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन्…; पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या तीन संतापजनक घटना

नांदेड सिटी आणि काळेपडळ पोलिस ठाण्यांत महिलांच्या छळाचे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणांत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणे, माहेराहून पैसे आणायला लावणे असे आरोप केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 30, 2026 | 02:20 PM
चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन्...; पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या तीन संतापजनक घटना

चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन्...; पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या तीन संतापजनक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात महिलांवरील छळाच्या घटना वाढल्या असून, अशातच आता पुण्यात तीन संतापजनक घटना घडल्या आहेत. नांदेड सिटी आणि काळेपडळ पोलिस ठाण्यांत महिलांच्या छळाचे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणांत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणे, माहेराहून पैसे, फर्निचर व दागिने आणण्यासाठी दबाव टाकणे, मानसिक छळ करणे तसेच तिहेरी तलाक उच्चारल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

नांदेड सिटी पोलिस ठाण्यात २७ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, परसराम अंकुश सोनटक्के (वय ३४, रा. घारे कॉलनी, मंठा, जि. जालना) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर सन २०१४ ते मे २०२६ या कालावधीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात आली. तसेच घर आणि व्यवसायासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

काळेपडळ पोलिस ठाण्यातील पहिल्या प्रकरणात २९ वर्षीय विवाहितेने रेनॉल्ड बेंजामिन फ्रान्सिस (वय ३६) याच्याविरोधात तक्रार दिली आहे. २८ जानेवारी २०१८ ते जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने कोणतेही ठोस कारण नसताना पत्नीला वारंवार मारहाण केली. चारित्र्यावर संशय घेत अपशब्द वापरले आणि सातत्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

काळेपडळ पोलिस ठाण्यातील दुसऱ्या प्रकरणात ३१ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून अब्दुल्ला रेजा अहमद शेख, रेजा अहमद शेख, खतीजा रेजा अहमद शेख आणि सानिया सईम सय्यद (सर्व रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० जुलै २०२० ते १७ जुलै २०२६ या कालावधीत माहेराहून फर्निचर, पैसे, सोन्याचे दागिने आणण्याची मागणी करण्यात आली. तसेच वडिलांचा फ्लॅट पतीच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत मारहाण केल्याचा आरोप आहे. तिहेरी तलाकला कायद्याने बंदी असतानाही पतीने तीन वेळा ‘तलाक’ उच्चारून विवाह संपुष्टात आणल्याचे सांगत धमकी दिल्याचाही आरोप केला आहे. या प्रकरणी मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही प्रकरणांचा संबंधित पोलिस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे महापौर यांच्या बंगल्याला ‘रामदूत’ नाव द्या; नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांची मागणी

Web Title: Three shocking incidents of atrocities against women have occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
3

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
4

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.