Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचं आमिष, मग तीन इंजेक्शन, धारदार शस्त्राचे वार आणि निर्वस्त्र हायवेवर फेकून दिलं, डॉक्टरचं विकृत कृत्य उघड; नेमकं काय घडलं?

एका डॉक्टरने आपल्या प्रेयसीला बेशुद्ध करून तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनेक जखमा केल्या नंतर निर्वस्त्र करून हायवेवर फेकून दिले. त्याला वाटले हायवेवर फेकल्याने तिला कोणीतरी चिरडलं आणि तिचा मृत्यू अपघात वाटेल. पण...

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 20, 2025 | 10:33 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टरने आपल्या प्रेयसीला बेशुद्ध करून तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनेक जखमा केल्या नंतर निर्वस्त्र करून हायवेवर फेकून दिले. त्याला वाटले हायवेवर फेकल्याने तिला कोणीतरी चिरडलं आणि तिचा मृत्यू अपघात वाटेल. पण असे न घडता झाले काही वेगळेच. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेऊया?

Solapur Crime: कारला ‘कट’ मारल्याने जीवघेणा हल्ला, मध्यरात्री रस्त्यावर राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा खून, महिला गंभीर जखमी

नेमकं काय घडलं?

एका डॉक्टरने आपल्या प्रेमिकांसोबत असं काही केलं जे खूप थरारक होत. डॉक्टरने आपल्या प्रेयसीला आधी तीन इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले. त्यांनतर तिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने अनेक खोल जखमा केल्या. त्यानंतर त्या युवतीला निर्वस्त्र करून दिल्ली-लखनऊ हायवेवर फेकून दिले. जेणेकरून तिला हायवेवर कोणतेही वाहन चिरडेल आणि तिचा मृत्यू रस्ता अपघातात झाला असे समजले जाईल.

त्यानंतर गावकऱ्यांचे लक्ष तिच्यावर गेले. युवती रक्तबंबाळ अवस्थेत होती. गावकऱ्यांनी तिला पाहिल्यावर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. युवतीला ओढणीने गुंडाळून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर युवतीच्या जबाबावरून पोलिसांनी डॉक्टरची चौकशी केली. सुरुवातीला डॉक्टरने पोलिसांना सांगितले की, तो त्या युवतीला ओळखत नाही. परंतु पोलिसांनी त्याच्या मोबाइलच्या कॉल डिटेल्स दाखवल्यावर तो घाबरला. त्यानंतर डॉक्टरने युवतीसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली.

डॉक्टरने पोलिसांना सांगितले की, त्याला युवतीपासून सुटका करून घ्यायची होती, म्हणून त्याने तिच्यावर अत्याचार केले. मिळालेल्या माहितीनुसार, ही युवती बदायूं येथील रहिवासी आहे. पाच वर्षांपूर्वी तिने बरेलीच्या मेडिकल कॉलेजमधून नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर बीसलपूर रोडवरील एका खासगी रुग्णालयात तिला नोकरी मिळाली. तिथेच तिची ओळख बीएएमएस डॉक्टरशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झाले.

डॉक्टरने युवतीला लग्न करू असे आमिष दाखवले. परंतु तो विवाहित असल्याचे तिला नंतर कळाले. त्यानंतर डॉक्टर आणि युवती यांच्यात भांडणे सुरु झाली मंगळवारी युवतीने डॉक्टरला सांगितले की, तिच्या पोटात दुकत आहे. डॉक्टरने तिला उपचाराच्या बहाण्याने तिच्या घरी जाऊन तीन इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने जखमा केल्या. त्यानंतर डॉक्टरने युवतीला कारच्या पुढील सीटवर झोपवून ड्रिपही लावली. मग मध्यरात्री 12 वाजता इन्व्हर्टिस युनिव्हर्सिटीजवळ हायवेच्या कडेला तिला निर्वस्त्र करून फेकून दिले. त्याचा हेतू होता की कोणतेही वाहन त्या युवतीला चिरडेल, ज्यामुळे तिचा मृत्यू होईल आणि तो अपघात वाटेल. एसएसपी अनुराग आर्य यांनी सांगितले की, डॉक्टरची चौकशी सुरू असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.

Thane News : बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत अपघात, 7व्या मजल्यावरून पडून स्टोअर मॅनेजरचा जागीच मृत्यू

 

 

Web Title: Throwing her naked on the highway the doctors perverted act exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 10:33 AM

Topics:  

  • crime
  • crime news

संबंधित बातम्या

Navi Mumbai: नववर्ष स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त, 2500 पोलीस तैनात
1

Navi Mumbai: नववर्ष स्वागतासाठी नवी मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त, 2500 पोलीस तैनात

आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?
2

आता गुन्हा केल्यावर शिक्षा नाही? दिल्ली सरकारने केले ‘हे’ विधेयक मंजूर; नेमका प्रकार काय?

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…
3

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! वर्षभरात १०३ ॲट्रॉसिटी आणि १५५…..; गुन्हेगारीचा आलेख उंचावला
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगर हादरले! वर्षभरात १०३ ॲट्रॉसिटी आणि १५५…..; गुन्हेगारीचा आलेख उंचावला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.