Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neral Cime: बाईक चोरी करणाऱ्या टोळीला दणका! मुख्य आरोपी अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात

Crime News: मुरबाड येथील समीर पांडुरंग भोईर यांनी आपली टीव्हीएस कंपनीची 'एन्टॉर्क-१२५' स्कुटी (क्र. एमएच ०५ एफटी ०८७७) वापरासाठी आणली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 28, 2026 | 06:46 PM
कर्जत क्राइम न्यूज

कर्जत क्राइम न्यूज

Follow Us
Follow Us:
  • दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नेरळ पोलिसांकडून पर्दाफाश
  • दोन अल्पवयीन मुलांसह एका तरुणाला घेतले ताब्यात
  • आरोपींकडून चोरीच्या एकूण ६५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त
कर्जत/Crime: नेरळ परिसर आणि कर्जत तालुक्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नेरळ पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीच्या एकूण ६५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे नेरळ आणि कर्जत पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

मुरबाड येथील समीर पांडुरंग भोईर यांनी आपली टीव्हीएस कंपनीची ‘एन्टॉर्क-१२५’ स्कुटी (क्र. एमएच ०५ एफटी ०८७७) वापरासाठी आणली होती. ही स्कुटी डिक्सळ-नेरळ येथील ‘रोहित ढाब्या’समोर रस्त्याच्या कडेला उभी केली असताना अज्ञात चोरट्यांनी ती लांबवली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३’ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीचा हिशेब मागितला अन् मित्राची हत्या; धावत्या एक्सप्रेसमधून आरोपी जेरबंद

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या पथकाने तपास सुरू केला.

गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपी इलियास फ्रान्सिस मिरांडा (वय १८ वर्षे, रा. गावदेवी बुवापाडा, अंबरनाथ, जि. ठाणे) याची ओळख पटवली. आरोपी वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांनी अंबरनाथ येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

Crime News: वांद्रे पूर्व हादरले! चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; ४० वर्षीय संशयित गजाआड

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत त्याने दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या तिघांकडून नेरळ परिसरातून चोरीला गेलेली सुमारे ४० हजार रुपये किमतीची ‘एन्टॉर्क’ स्कुटी, तसेच कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेली २५ हजार रुपये किमतीची ‘होंडा डिओ’ (क्र. एमएच ४६ एए २३३१) जप्त केली आहे. या जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत ६५ हजार रुपये आहे. ही यशस्वी कारवाई नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस हवालदार सचिन वाघमारे, पोलीस अंमलदार राजेभाऊ केकान, आशु बेंद्रे आणि विनोद वांगणेकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Neral police arrested gang theft two wheeler karjat crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • crime news
  • Karjat
  • neral

संबंधित बातम्या

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…
1

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

KARJAT: कर्जतच्या प्रकल्पांवरून आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; गंभीर आरोप
2

KARJAT: कर्जतच्या प्रकल्पांवरून आमदार थोरवेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल; गंभीर आरोप

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
3

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
4

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.