Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली…

येवला तालुक्यातील ममदापूर येथे अंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने दीड वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आई-वडील दैनंदिन कामात व्यस्त असताना ही दुर्घटना घडली. गंभीर भाजलेल्या शिवानी साबळेला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 28, 2026 | 04:08 PM
Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली...

Accident News: येवला तालुक्यात दुर्दैवी घटना; आई-वडिलांच्या नजरचुकीने गरम पाणी अंगावर सांडले, चिमुकली...

Follow Us
Follow Us:
  • गरम पाणी अंगावर सांडल्याने दीड वर्षांची शिवानी गंभीर भाजली
  • उपचारासाठी रुग्णालयात नेले; उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू
  • ममदापूरमध्ये हृदयद्रावक घटनेने साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
 

येवला : येवला तालुक्यातील ममदापूर येथे अंघोळीसाठी ठेवलेले गरम पाणी अंगावर सांडल्याने दीड वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शिवानी साबळे असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ममदापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…

अंघोळीचे गरम पाणी अंगावर सांडले

मिळालेल्या माहितीनुसार, साबळे कुटुंबातील सदस्य सकाळच्या दैनंदिन कामात व्यस्त होते. त्यावेळी अंघोळीसाठी गरम करून ठेवलेले पाणी अचानक दीड वर्षांच्या शिवानीच्या अंगावर सांडले. या दुर्घटनेत चिमुकली गंभीररीत्या भाजली. कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत तिला तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले.

उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू

शिवानीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चिमुकलीच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. काही वेळापूर्वी घरात असलेली चिमुकली अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

हेही वाचा: Crime News: वांद्रे पूर्व हादरले! चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; ४० वर्षीय संशयित गजाआड

परिसरात हळहळ

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच ममदापूर परिसरात शोककळा पसरली. दीड वर्षांच्या चिमुकलीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घरात लहान मुले असताना गरम पाणी, गरम द्रव किंवा अन्य धोकादायक वस्तू ठेवताना विशेष काळजी घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे. घटनेमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Yeola mamdapur hot water spills on 1 5 year old girl dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Accident Case
  • Accident in Nashik
  • Baby Death
  • Child Death
  • crime news
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…
1

Nashik Crime: सिग्नल तोडून महिला दुचाकीस्वाराला धडक; पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न अन्…

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
2

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
3

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
4

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.