crime ( फोटो सौजन्य- pinterest )
जालना जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रियकराच्या बदनामीच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आला आहे. तरुणीचा मृतदेह प्रियकराच्या घरी आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शिवानी गिरी असे या मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल आघामसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हेगारांच्या घरांचे ‘गुगल मॅपिंग’; तब्बल चार हजार गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर
ही घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर गावात घडली आहे. एका १८ वर्षीय शिवणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवणीने बॉयफ्रेंडच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून हा टोकाचं पाऊल उचल्याच समोर आलं आहे. विशेष म्हणजे तिचा मृतदेह प्रियकराच्या घरी आढळून आला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात एकाच खळबळ उडाली आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
शिवानीला तिचा बॉयफ्रेंड विशाल आघाम याने तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली येऊन तिने आत्महत्येचं टोकाचा पाऊल उचलल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात भोकरदन पोलीस ठाण्यात विशाल आघामसह आणखी चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजार केलं असता न्यायालयाने चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शिवणीच्या नातेवाईकांकडून ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा गंभीर आरोप केला करण्यात येत आहे. यामुळे हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या, याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे.
पुण्यात कामगाराकडून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 14 लाखांना घातला गंडा
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या देखभालीसाठी ठेवलेल्या कामगारानेच १३ लाख ९२ हजार रुपयांची फसणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कामगारावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवकुमार पोद्दार (वय २६, रा. बलिया, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत ३८ वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलिसांनी तक्रार दिली आहे.
पुण्यात कामगाराकडून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 14 लाखांना घातला गंडा