crime (फोटो सौजन्य: social media)
वैष्णवी हगवणे प्रकरण ताज असतांना आता पुन्हा असाच एक प्रकरण समोर येत आहे. आष्टी तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं आहे. महिलेने घरासमोरच्याच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव सविता भाऊसाहेब विधाटे असे आहे. या प्रकरणी भाऊसाहेब विधाटे, सासरा किसन विधाटे आणि सासु लिलाबाई विधाटे यांच्या विरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकचा तपास करत आहे.
प्रेयसीच्या जळत्या सरणावर टाकली प्रियकराने उडी; नागरिकांनी चोपले, नागपुरातील प्रकार
पुढे आलेल्या माहितीनुसार, सविता आणि भाऊसाहेब यांचा विवाह २००८ मध्ये झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही काळ विधाटे यांनी सविताला चांगले नांदवले. काही काळानंतर सासरच्यांनी तिला त्रास द्यायला सुरवात केली. मुलांना दूध पिण्यासाठी माहेरहून गाय घेऊन ये असं म्हणत तिला त्रास द्यायचे. यानंतर स्कुटीसाठी पैसे मागितले. यानंतर काही दिवसांनी सविताच्या नणंदेला अहिल्यानगर येथे घर घ्यायचे असल्याने त्यासाठी पैश्याची मागणी सविताच्या माहेरी केली जात होती. यावेळी मात्र वडील काशिनाथ फसले यांनी पैसे नसल्याने देऊ शकत नाही असे सांगितले.
यानंतर विधाटे कुटुंबीयाने स्वतःचे अहिल्यानगर येथील घर विकण्याची तयारी सुरु केली होती. याला सविताने विरोध केला. यामुळे सविताला सासरच्याने पुन्हा त्रास सुरवात केली. शेवटी या त्रासाला कंटाळून सविताने घरासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात काशिनाथ फसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उसने दिलेले 8 हजार परत घ्यायला तरूणाला बोलावलं अन् नंतर चाकूने वार करत संपवलं