नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्हान येथील १९ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव अंकिता असे आहे. ८ जून रोजी तिने गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर शवविच्छेदनानंतर अंकितावर अंत्यसंस्कार सुरु होता. अंत्यसंस्कार सुरु असतानाच तिच्या प्रियकराने तिच्या सरणावर जाऊन उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेकी उपस्थित असेलेल्या नागरिकांनी त्याला चांगलाच चोपला. तरुणाचा नाव अनुराग मेश्राम असं आहे. अनुराग सध्या कामठी परिसरात एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
सांगलीच्या कुपवाडमध्ये नवविवाहित गर्भवतीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर…
नेमकं काय घडलं?
नागपूरयेथील कन्हान येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. अंकिता असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. अंकिता आणि अनुराग हे एकाच गावातील असून या दोघांमध्ये मैत्री होती. या मैत्रीच्या वाटेत पुढे अडसर असल्याने अंकिताने राहत्या घरी रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. यामध्ये अंकिताने लिहून ठेवलेल्या चिठ्ठी मध्ये माझ्या मृत्यूसाठी अनुराग मेश्रामला जबाबदार धरू नये आणि अनुरागला काहीही करू नये, असा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अंकिताचे शवविच्छेदन पार पडल्यानंतर दुपारी चार वाजताच्या सुमारास अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. तिच्यावर अंत्यविधी पार पाडत असताना अचानक अनुराग मेश्राम हा तिथे पोहोचला. त्याने सरणावर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्नात होता. घटनेच्या माहितीनंतर अनुरागच्या वडील आणि भावांनी त्याला लगतच्या रुग्णालयात दाखल केले.
सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. सरणावर उडी घेत असताना त्याने कुठलेतरी द्रव्य प्राशन केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वैद्यकीय अहवालानंतरच या सगळ्या बाबीचा खुलासा होणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
बीड हादरलं! लग्नाचं आमिष दाखवत २० वर्षीय तरुणीवर अत्याचार, ५ महिण्याची गर्भवती…